Sunday, May 12, 2024
Homeराज्यमध्य रेल्वेची ‘पंढरपूर आषाढी वारी ७६ विशेष गाड्या चालवणार नागपूर - मिरज,...

मध्य रेल्वेची ‘पंढरपूर आषाढी वारी ७६ विशेष गाड्या चालवणार नागपूर – मिरज, नागपूर – पंढरपूरसह अमरावती, खामगावहूनही होणार वारीची सोय…

Share

अकोला – अमोल साबळे

कोट्यवधी वारकऱ्यांच्या आस्थेचा विषय असलेल्या पंढरपूर वारीने मध्य रेल्वेलाही आकर्षित केले आहे. त्यामुळे यंदा मध्य रेल्वेतर्फे पंढरपूर आषाढ वारीसाठी तब्बल ७६ रेल्वेगाड्या चालविण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे.

नागपूरहून मिरज, नागपूर- पंढरपूर यासह नवीन अमरावती- पंढरपूर, खामगाव- पंढरपूर, भुसावळ- पंढरपूर, लातूर- पंढरपूर, मिरज- पंढरपूर, मिरज- कुर्डूवाडी या विशेष गाड्या ‘पंढरपूर आषाढी एकादशी’निमित्त चालविल्या जाणार आहेत. परिणामी, लाखो भाविकांची सोय होणार आहे.

नागपूर- पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक ०१२०७ स्पेशल नागपूरहून २६ जून आणि २९ जून २०२३ रोजी सकाळी ८:५० वाजता नागपूरहून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता ही गाडी भाविकांना पंढरपूरला पोहाेचविणार आहे.

गाडी क्रमांक १२०८ विशेष पंढरपूर येथून २७ आणि ३० जून रोजी सायंकाळी पाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दाेन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन राहणार आहे.

गाड्यांचे थांबे

या गाड्यांचे थांबे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे राहणार आहे.

नवीन अमरावती – पंढरपूर विशेष

गाडी क्रमांक ०१११९ विशेष गाडी नवीन अमरावती येथून २५ आणि २८ जून रोजी दुपारी २:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पंढरपूरला पोहोचेल.”

गाडी क्रमांक ०११२० विशेष गाडी पंढरपूर येथून २६ आणि २९ जून रोजी रात्री ७:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:४० वाजता नवीन अमरावती स्थानकावर पोहोचेल.

येथे थांबणार, भाविकांना घेणार

ही गाडी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी स्थानकावर थांबेल. येथूनही भाविक या गाडीत बसू शकणार आहेत.

या गाडीत एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दाेन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन राहणार आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: