Friday, May 3, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघातात...तीन जण गंभीर जखमी : वणी रंभापुर...

मूर्तिजापूर | राष्ट्रीय महामार्गावर कारचा अपघातात…तीन जण गंभीर जखमी : वणी रंभापुर नजीकची घटना..!

Share

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी रंभापुर नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचा चुराडा झाला,तर या कार मधील तिन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दरम्यान घडली,

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला कडून मुर्तिजापूर कडे जाणारी कार क्रमांक एम एच ३० ४३ ए एल १६०७ या कारमधून चालक जाँनसन वाघमारे वय ५४, अनिल सुखदेव चराटे वय ६०,लता सुखदेव चराटे वय ५५ मुर्तिजापूर हे जात होते, लता चराटे यांचेवर केमोथेरपी करून मुर्तिजापूर परत जातांना वणी रंभापुर ते पैलपाडा कॅनाल नजीक या गाडीला अपघात झाला,

या अपघातात कारचा चुराडा झाला,तर कार मधील तिन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे, हेडकॉन्स्टेबल संतोष निबेंकर, संजय भारसाकडे यांनी तर माॅ चंडिका माता आपत्कालीन व्यवस्थापन पथक, वन्दे मातरम् आपत्कालीन व्यवस्थापन पथक कुरणखेड यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमधून अडकून पडलेल्या तिघांना बाहेर काढून शर्थीचे प्रयत्न केले,

दरम्यान सदर जखमींना अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, नेमके अपघात कसा झाला हे वृत्त लिहिस्तोर समजून आले नाही, पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: