Friday, May 17, 2024
HomeMarathi News Todayबुलढाणा | अन महिलांनी 'या' व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयातच धुतले...व्हायरल व्हिडीओ

बुलढाणा | अन महिलांनी ‘या’ व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयातच धुतले…व्हायरल व्हिडीओ

Share

बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तहसील कार्यालय परिसरात दलालांचा सुळसुळाट बघायला मिळतो, त्यात RTI कार्यकर्त्याचा समावेश असतो. एखाद्याच्या विषयी माहिती काढून त्याची तक्रार करणे नंतर त्याला ब्लॅकमेल करणे हा अनेकांचा धंदा झाला आहे. असच एक प्रकरण बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्ररूप धारण करून, त्यांना अश्लील शिवीगाळ आणि एक लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष चांदणे याने भालेगाव सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य विरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केली असून प्रकरणं आपसात करण्यासाठी पैश्याची मागणी केल्याचे बोलल्या जाते. असाच प्रकार भालेगाव चे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांचेसोबात ही घडला. संतोष चांदणे त्यांच्या विरोधात ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे विरोधात तक्रार केली असून प्रकरणं आपसात करण्यासाठी एक लाख रुपये मागितले आणि बोलताना अश्लील शिवीगाळ केलीय. त्यामुळे निकम आणि काळे यांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलेच धुतले असल्याचे पाहायला मिळाले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: