Saturday, May 18, 2024
Homeराज्यसातगाव, किन्हाळा येथे बहुजन नायक कांशीरामजी यांना बसपाचे अभिवादन...

सातगाव, किन्हाळा येथे बहुजन नायक कांशीरामजी यांना बसपाचे अभिवादन…

Share

नागपुर – शरद नागदेवे

नागपुर – हिंगणा -बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा, बुट्टीबोरी झोनच्या वतीने नागपूर जिल्हा माजी सचिव व माजी हिंगणा विधानसभा इंचार्ज सतिश शेळके यांच्या नेतृत्वात हिंगणा तालुक्यातील सातगाव किन्हाळा येथील धम्मज्योती बुध्दविहार येथे बामसेफ, डी.एस.फोर, बी.आर.एस. तथा बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेब यांच्या 17 व्या परीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन समारोह संतोष शेंदरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बहुजन चळवळीतील प्रबोधनकार महेंद्र लोखंडे यांनी कांशीरामजी यांच्या जिवनावर वीस्तृत माहिती देतांनी सांगितले की, आपल्या संविधानिक हक्काची रखवाली करुण त्यांना अमलात आनण्यासाठी बहुजनांना बसपा शिवाय पर्याय नाही महापरुषांना खरे अभिवादन तेव्हाच होईल जेव्हा आम्ही आपल्या हक्क अधिकारासाठी बहुजनांनी सत्ता स्थापनेचा संकल्प करुन सत्ता प्राप्त करावे असे संबोधित केले,

प्रसंगी उपसरपंच सातगाव प्रविणा शेळके, विहार समितीच्या मृणाली वाने, हि.वी. उपाध्यक्ष महेंद्र पाटिल, जिल्हा माजी अध्यक्ष राजकुमार बोरकर, हिंगणा विधा. माजी अध्यक्ष महेश वासनिक, नाग. जिल्हा माजी सदस्य सुरेश मानवटकर, सुधाकर सोनपिंपळे, तथा सुरेंद्र शेंडे मंचाशीन होते कार्यक्रमाचे संचालन माजी हिंगणा विधानसभा उपाध्यक्ष चंद्रशेखर निकोशे व आभार पुंडलीक गोटेकर यांनी केले.

यासह समारोहाच्या समाप्ती वेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक समाजसेवक सतिश शेळके यांना कार्यक्रमाचे अतिथी व उपस्थितीत जनसमुदायांनी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.

या समारोहाच्या यशस्वीतेसाठी विजय चिकाटे, अरविंद मेंढे, मनिष रावले, मुरलीधर कैकाडी, तुलसीदास तराले, प्रमोद शामकुंवर, स्नेहल शेळके, आशु शेळके, कीशोर शेळके, यांच्या सहयोगाने परीसरातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: