Sunday, May 12, 2024
Homeराज्यजलालखेडा येथील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, जिल्हा स्तरीय मलखांब स्पर्धेत पटकवले व्दितीय पारितोषिक...

जलालखेडा येथील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, जिल्हा स्तरीय मलखांब स्पर्धेत पटकवले व्दितीय पारितोषिक…

Share

  • एस. आर. के इंडो पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यंचा समावेश.
  • १४ वर्ष वयोगटात झाले उपविजेते.
  • रॉयल बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने आयोजन.

नरखेड – द रॉयल बहुउद्देशीय क्रीडा व शिक्षण संस्था नागपूर यांच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय मलखांब स्पर्धेत जलालखेडा येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्हा स्तरीय मलखांब स्पर्धा बुधवारी नुकतीच पार पडली असून नागपूर जिल्ह्यातील बहुतांश शाळेनी या स्पर्धेत बाग घेतला होता. जलालखेडा येथील एस. आर. के इंडो पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थी नागपूर येथील मलखांब स्पर्धेत सहभागी झाली होती.

या यामध्ये 14 वर्ष वयोगट मध्ये एस. आर. के इंडो पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत व्दितीय क्रमांक पटकावला. अतिशय कमी वेळात खूप मेहनत घेत त्यांनी यश मिळवले. 14 वर्ष वयोगटामध्ये जलालखेडा येथून आराध्य खडसे, वेदांत ठाकरे, मंथन राऊत , सर्वेश गुल्हाने यांनी या मलखांब स्पर्धेत भाग घेत व्दितीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव रोशन केले आहे. त्यांनी हे यश डॉ. मनोज वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रसिका भक्ते व चंद्रशेखर मरस्कोल्हे या क्रीडा शिक्षकांच्या सरावात मिळवले असून त्यांनी या यशाचे श्रेय आई वडील , क्रीडा शिक्षक, प्राचार्य शुभांगी अर्डक व शाळेतील शिक्षकांना दिले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: