Homeराज्यनिसर्ग संवर्धनात केलेल्या उकृष्ट कार्याबद्दल धाडसी सर्पमित्र सागर धावडे यांचा गौरव...

निसर्ग संवर्धनात केलेल्या उकृष्ट कार्याबद्दल धाडसी सर्पमित्र सागर धावडे यांचा गौरव…

Share

रामटेक – राजु कापसे

नागपूर येथे १९ फेब्रुवारी ला राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यात रामटेक शहरात वास्तव्यास असणाऱ्या धावडे कुटुंबातील एक धाडसी सर्पमित्र सागर धावडे गेल्या सहा सात वर्षांहून अधिक काळ शेकडो सापांना लोक वस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडुन जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले यामुळे सापाचा व लोकांचा जीव वाचला आहे.

त्यात अती विषारी व बिन विषारी सापाना जीवनदान दिले त्यासोबत अती दुर्मीळ वन्य प्राण्यांच्या समावेश आहे त्याच बरोबर वाहनाच्या धडकेत जखमी झालेली गाय असो किंवा वासरू, खवल्या मांजर,विंचू, घोरपड, सरडा, गुहिरे तसचे जखमी प्राणी कबुतर, चिमणी, कावळा, बगळा, मांजर, कुत्रा त्या प्रसंगी साप व अंधश्रद्धा, सापाची ओळख,असा विविध प्रकारचे वन्य जीव यांचे रक्षण करणे निसर्गाच्या स्वाधीन करणे व त्यांना सानिध्यात सोडण्याचे काम केले आहे.

आणि आपले कर्तव्य समजून कार्य केले. सर्पमित्र हे आपले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली भूमिका प्रामाणिक व चोखपणे पार पाडतात. त्याचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.निरपेक्ष व नि:स्वार्थी कार्याची दखल घेत नुकत्याच झालेल्या नागपूर येथे १९ फेब्रुवारी ला शिव जयंती निमित्त राजा शिव छत्रपती प्रतिष्ठान तर्फे गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी श्रीमंत राजे मुधोजी भोसले महाराज त्याच बरोबर कार्यक्रमाला उपस्थित श्री. संजय पाटील अतिरिक्त आयुक्त पोलिस गुन्हे शाखा,आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, श्री मोहन नाहातकर सचिव एम. पी. एज्युकेशन सोसायटी, श्री गजानन ठाकरे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, चंद्रशेखर मोहिते, डॉक्टर विनोद जैस्वाल, बंटी शेडके, कार्यक्रमाचे संयोजक मिलिंद येवले आदी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: