HomeSocial TrendingBody Artist | तरुणीची पायावरील कलाकारी ओळखणे कठीण...पाहा व्हिडिओ

Body Artist | तरुणीची पायावरील कलाकारी ओळखणे कठीण…पाहा व्हिडिओ

Share

Body Artist : आजच्या डिजिटल युगात प्रत्येक दुसरा व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. अनेक प्रकरणांमध्ये, लोक सोशल मीडियाद्वारे लोकप्रिय झाले आहेत. कोणत्याही व्यक्तीला आपली कला दाखवण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर प्रत्येक क्षणी हजारो व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केले जातात, परंतु यापैकी काही व्हिडिओ किंवा फोटोच व्हायरल होतात. असाच एक आश्चर्य चकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तरुणीची पायावरची अप्रतिम कलाकृती पाहून तुमचा डोळ्यावर विस्वास बसणार नाही…

या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या पायावर वेगवेगळ्या प्रकारची अप्रतिम पेंटिंग्ज बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी कधी तिच्या पायावर निवडुंगाचे रोप काढत आहे तर कधी केळी, बटाटे, ब्रेड, कलर वॉल आणि कॉर्न पायांवर रेखाटत आहे. व्हिडिओमध्ये ही मुलगी तिच्या पायावर या सर्व गोष्टींचे इतके अप्रतिम पेंटिंग बनवत आहे. मुलीची कलाकृती अशी आहे की तिचे पाय आणि पेंटिंगमध्ये तुम्ही गोंधळून जाल.

हा व्हिडिओ प्रणव नावाच्या एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना, वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की पुढील स्तराचा बॉडी आर्टिस्ट.

हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ अल्पावधीतच हजारो वेळा पाहिला गेला आहे. या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: