Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयअकोल्यात लालाजींच्या शोकपर्वात भाजपचं मताचं राजकारण...

अकोल्यात लालाजींच्या शोकपर्वात भाजपचं मताचं राजकारण…

Share

डाबकीरोड उड्डाणपुलाचं उद्घाटन करणाऱ्या भाजपच्या असंवेदनशीलतेवर अकोलेकर जनता अवाक…

अकोला : भाजप स्वत:ची ओळख ‘पार्टी विथ डिफरंस’ अशी सांगते. भाजप तळागाळात रुजला तो असंख्य कार्यकर्त्याच्या निष्ठा, सचोटी आणि समर्पणावर. मात्र, आज मोठा झालेला भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या याच समर्पणाला विसरला की काय?, असा प्रश्न आता जनता उपस्थित करते आहे. भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यासंदर्भात जे झालं तशीच अवस्था राज्य आणि जिल्हा पातळीवर अनेकांची आहे. राज्य पातळीवर एकनाथ खडसेंसारखा नेता भाजपमधील याच प्रवृत्तीने संपवला आहे. याच भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंही प्रचंड त्रास झाला. जनसंघापासून भाजपचं काम करणाऱ्या भाऊसाहेब फुंडकरांसारख्या मोठ्या नेत्याला आयुष्याच्या उत्तरार्धात मंत्रिपद देण्यात आलं. अशी असंख्य भाजपमधली उदाहरणे जे आहेत ते भाजपच्या ‘गरज सरो वैद्य मरो’ या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब करणारी आहेत. अकोल्याचे 1995 पासून सातत्याने सहाव्यांदा नेतृत्व करणाऱ्या आमदार गोवर्धन शर्मा म्हणजेच लालाजींचं अकोल्यातील भाजपाच्या वाढीत फार मोठे योगदान आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला त्यांनी भाजपचा गड बनवला. त्यांनी तीस वर्षापासून अकोला शहराचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं. दुर्दैवाने त्यांचा कॅन्सरसारख्या आजाराने मृत्यू झाल्यामुळे अकोलेकरांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली. मात्र भाजपाला लालाजींच्या मृत्यूचं दुःख नाही का?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. याला कारण आहे लालाजींच्या निधनानंतर अगदी आठवडा उलटताच भाजपने डाबकीरोड रेल्वे उडानपुलाच्या उद्घाटनाचा फार्स केला‌ तब्बल आठ वर्षांपासून अकोलेकरांना या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांना झालेल्या त्रास भाजपाला दिसला नाही‌ आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर या रेल्वे पुलाचं उद्घाटन करीत भाजपने मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र, ज्या लालाजींच्या भरवशावर अकोल्यात भाजपा वाढली. त्यांच्या मृत्यूला आठवडाही पूर्ण न होताच भाजपाने केलेल्या उद्घाटन समारंभाचे लोकांना आश्चर्य वाटत आहे. आणखी पंधरा दिवस या रेल्वे पुलाचे उद्घाटन समोर ढकललं असतं तर काही फरक पडला असता का?, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. लालाजींच्या निधनानंतर आलेल्या दिवाळीत भाजपने त्यांचा निधन झाल्याचं कारण कोणतेच कार्यक्रम भाजप करणार नसल्याचा म्हटलं होतं. मात्र, मतांच्या राजकारणात आकंठ बुडवलेल्या अकोला भाजपातील नेत्यांना लालाजींच्या जाण्याचं दुःखाचे भान असू नये याचं सर्वांना आश्चर्य वाटत आहे. आमदार रणधीर सावरकर याबाबतीत अनेकदा स्वतःला संवेदनशील असल्याचं दाखवतात‌ त्यांच्या आशीर्वाद आणि पुढाकाराशिवाय अकोल्यात भाजपाचे पाशही हलत नाही. मग स्वतःला संवेदनशील म्हणणाऱ्या आमदार रणधीर सावरकरांनी उड्डाणपूल उद्घाटन सोहळ्याचा फार्स कशासाठी रचला अशी चर्चा आता होत आहे.

शोकपर्वात भाजपने उद्घाटनाचा केलेला कार्यक्रम लज्जास्पद : वंचित बहुजन आघाडी

गेले दोन दशकं रखडलेल्या डाबकी रोड येथील उड्डाणपुलाचे उदघाटन लोकनेते स्वर्गीय लालाजी शर्मा यांच्या दुःखद निधनाच्या आठ दिवसाच्या आत आटपून अकोला भा ज प ने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे . 30 वर्ष ज्यांनी भाजप चा गढ मजबूत आणि अभेद्य ठेवला असे लोकप्रिय आमदार स्वर्गीय लालाजी शर्मा यांचा किमान तेरा दिवस शोक पूर्ण होऊ द्यायचा होता . दुःखद प्रसंगात उत्सवी उदघाटन आटपून अकोला भाजप ने लोकनेते स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांचा एक प्रकारे अवमानच केला आहे . उपयोगिता संपली की कार्यकर्त्याला विसरून जाणे ही जुनीच परंपरा अकोला भाजप ने राखली असेच म्हणावे लागेल .

प्राचार्य डॉ धैर्यवर्धन पुंडकर
प्रदेश उपाध्यक्ष व राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: