Sunday, May 12, 2024
Homeराजकीयरामठी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजप चे दिलेश ठाकरे बिनविरोध...

रामठी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी भाजप चे दिलेश ठाकरे बिनविरोध…

Share

नरखेड तालुक्यातील चर्चित ग्रामपंचायत रामठी येथे उपसरपंचपदी भाजप दिलेश ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त सरपंच्या सौ गीताबाई घोरपडे यांच्या अध्यक्षतेत व निवडणूक निरीक्षक नरेंद्र बांबल व ग्राम पंचायत सचिव विजय गिरहेपुंजे यांच्या उपस्थितीत रामठी येथील उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.

यात दिलेश ठाकरे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रा.पं. सदस्य राहुल चिकने, शोभाबाई मानमोडे, रेखाबाई चौधरी, नंदाबाई शेंदरे, वर्षाबाई नासरे उपस्थित होत्या. रामठी ग्रा.पं.वर गत 20वर्षांपासून ठाकरे यांचे वर्चस्व आहे. . निवडीबाबत सर्व ग्रामस्थ उपस्थित होते..सरपंच उपसरपंच यांच्या सत्कार करताना सुभाष नोरोलिया , पवन कंळबे व इतर.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: