Wednesday, May 1, 2024
Homeराज्यकर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन...

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपा युवा मोर्चाचे आंदोलन…

Share

सांगली – ज्योती मोरे

कर्नाटकचे काँग्रेसचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात मिरजेतील गांधी चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शना करून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

काँग्रेसचे कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज मिरजेतील गांधी चौकात भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं,महाराष्ट्र प्रदेश सचिव सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख मोहन वनखंडे, भाजप नेते मकरंद देशपांडे,

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांच्या उपस्थितीत जोरदार निदर्शनं करत खर्गे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून तो जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र यावेळी पोलिसांनी विरोध केल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: