Friday, May 17, 2024
Homeनोकरीतरुणांसाठी नोकरीची मोठी संधी...तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे भव्य रोजगार मेळावा...

तरुणांसाठी नोकरीची मोठी संधी…तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे भव्य रोजगार मेळावा…

Share

प्रतिनिधी | तरुणांसाठी आनंदाची बातमी, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी तर्फे येत्या २३ जुलै रोजी सकाळी ९:०० वाजता स्थानिक श्री. गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मेन रोड, मुर्तिजापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सातवी ते पदवीधारक तरुणांना सहभागी होता येणार आहे, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचे आव्हान तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी केले आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुमारे ५० कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. मेळाव्यास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे नोंदणी अर्ज आणि बायोडेटा आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता:

७ वी ते १२ वी, बी. ए., एम. ए., बी.कॉम., एम.कॉम., बी.एस्सी., एम.एस्सी., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए.एम., एम.बी.ए., आय.टी.आय., बी.ई.(सर्व शाखा), कुठल्याही क्षेत्रातील पदवी तथा पदविका.

या क्षेत्रात संधी :
मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स, रिटेल, सेल्स व मार्केटिंग,

बँकिंग इन्शुरन्स, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलीटी, टेलिकॉम व इतर, आय. टी, बि.पी.ओ./ के.पि.ओ., फार्म.

रोजगार मेळाव्यासाठी उमेदवारांनी येथे करा ऑनलाईन नोंदणी : https://forms.gle/5QnGLrfYNoUxkEzA9

ऑफलाईन नोंदणी अर्ज मिळण्याचे ठिकाण: तीक्ष्णगत कार्यालय, कोहिनूर हार्डवेअर समोर, गोयनका नगर, मुर्तिजापूर


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: