Homeगुन्हेगारीबिलोली तालुक्यात तोतया पोलिसांनी सेवकास लुटले; खोट्या पोलिसास शोधण्याचे खऱ्या पोलिसापुढे मोठे...

बिलोली तालुक्यात तोतया पोलिसांनी सेवकास लुटले; खोट्या पोलिसास शोधण्याचे खऱ्या पोलिसापुढे मोठे आव्हान…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात तोतया पोलिसांचे प्रमाण वाढले असल्याने खोट्या पोलिसांना पकडण्याचे मोठे आव्हान खऱ्या पोलिसापुढे निर्माण झाले आहे. बिलोली तालुक्यातील खतगाव पाटीजवळ पोलीस असल्याची बतावणी करून एका सेवकास लुटले आहे.या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिलोली ते देगलुर जाणाऱ्या मेन रोडवर खतगाव पाटीजवळ देगलूर तालुक्यातील मालकापूर येथील मालू देवराव कांबळे हे आपल्या मोटार सायकल वरून 11 जानेवारी रोजी बिलोली ते देगलुर कडे जात असतांना मुतन्याळ गावाजवळील खतगाव पाटीजवळ रोडवर दोन अनोळखी ईसम स्कुटीवरून येऊन मालू कांबळे यांच्या मोटार सायकल समोर स्कुटी लाऊन आम्ही पोलीस असल्याचे बतावणी करून लायसन्स दाखव असे म्हणुन कांबळे यांच्या गळ्याला चाकुचा धाक दाखवुन त्याचे हातातील बोटातील एक तोळ्याचे सोन्याचे दोन अंगठ्या किंमती अंदाजे 40,000 /- रूपयाच्या जबरीने काढुन घेवुन धाक दाखवून पळुन गेले.

या प्रकरणी फिर्यादी मालु देवराव कांबळे, वय 38 वर्षे, व्यवसाय नौकरी सेवक रा. मलकापुर पो. देगाव ता. देगलुर जि. नांदेड यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोस्टे बिलोली गुरनं 05/2023 कलम 392, 170, 34 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल् करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक ए एन नरूटे हे करीत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: