Friday, May 3, 2024
Homeगुन्हेगारीभातकुलीच्या CEO करिश्मा वैद्य यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले...अमरावती ACB...

भातकुलीच्या CEO करिश्मा वैद्य यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले…अमरावती ACB ची कारवाई…

Share

अमरावती जिल्ह्यातील येत असलेल्या भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना २० हजारांची लाच घेताना अमरावती लाचलुचपतविरोधी पथकाने रंगेहात पकडले असून करिष्मा वैद्य वय वर्ष 27 असे आरोपीचे नाव असून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन खोलापूरी गेट अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना भातकुली येथे शिलाई प्रशिक्षण आणि गारमेंट्स व्यवसाय टाकायचा होता. त्यासाठी त्यांना नगर पंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे होते. त्यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता त्यांनी संबंधिताला 50 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांच्या तक्रारी नंतर दि. 2/11/ 2022 रोजी पडताळणी केली असता तडजोडी अंती 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.

दि.10/11/2022 रोजी तडजोडीची रक्कम देण्याबद्दल पडताळणी करण्यात आली असता सदर रक्कम त्यांनी राहत्या घरी न्यु महालक्ष्मी नगर अमरावती येथे घेऊन यायला सांगितली. आज दि 11/11/2022 रोजी त्यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अमरावती परिक्षेत्र अमरावती, मा. अप्पर पोलीस अधीक्षक,अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन, शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रवीण पाटील यांनी केली.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: