Thursday, May 2, 2024
Homeराज्यकपाळावरील भस्म हा सात्विक अलंकार - जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी...

कपाळावरील भस्म हा सात्विक अलंकार – जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशी मठ वाराणसी…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली येथे संपन्न होत असलेल्या आध्यात्मिक आशिर्वचन व शिव कथा धर्म सभेत हे मत व्यक्त केले. महिलांनी शिवतांडव स्तोत्र सादर केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली..

जगद्गुरु पुढे असे म्हणाले की, भस्म शरीरावर धारण करण्याची प्रथा ही अनादी काळापासून चालत आलेली आहे..
शंकर देव देखील दररोज भस्म परिधान करीत असत..

लिंगायत धर्मातील प्रत्येक व्यक्तीने भस्म धारण केल्या नंतर त्याच्या मनात सात्विक विचार प्राप्त होतात, त्याच्या मनात कोणतेच भेदभावाचे विचार येत नाहीत, म्हणून लिंग धारण करून आचरण केल्यास आपणास भौतिक व आध्यात्मिक संपत्ती प्राप्त होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाचार्य बेळंकी महाराज व म्हैशाळकर महाराज यांनी धर्मोपदेश केला.या कार्यक्रमाला माननीय विश्वजीत कदम माननीय जितेश कदम मा.जयंत पाटील, मा. दिनकर तात्या पाटील, मा. पृथ्वीराज पाटील, मा. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वामीजींचे दर्शन घेऊन स्वामीजींच्या कडून शुभाशीर्वाद घेतले.. सकाळच्या 17 मध्ये एकूण 1360 लोकांनी दीक्षाविधी घेतला सांगली जिल्ह्यातील जंगम समाजाने या कार्यक्रमाचे पौरोहित केले.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: