Thursday, April 25, 2024
Homeराज्यभारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभातर्फे लाभार्थी मेळावा व संघटनात्मक बैठक संपन्न...

भारतीय जनता पार्टी रामटेक विधानसभातर्फे लाभार्थी मेळावा व संघटनात्मक बैठक संपन्न…

Share

रामटेक – राजु कापसे

भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.भारतीय जनता पार्टी ,रामटेक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी यांची भाजपा कार्यालय कीराड भवन रामटेक येथे संघटनात्मक बैठक संपन्न झाली.

बैठकीमध्ये केंद्र व राज्यसरकारच्या योजनेची लाभार्थी मेळावा घेण्यात आले.लाभार्थी यांचा सोबत प्रवासी कार्यकर्ते यांनी लाभार्थी विथ सेल्फी अभियान राबविण्याचे आव्हाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी केले.लाभार्थी विथ सेल्फी अभियानाची जवाबदारी पंचायत सर्कल प्रमुख यांच्यावर सोपवण्यात आली.

येत्या सहा तारखेला नागपूर येथे भारतीय जनता युवा मोर्चा ची एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे व रामटेक विधानसभा क्षेत्रातील नारीशक्ती वंदन महिला मेळावा रामटेक येथे घेण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

लाभार्थी मेळाव्याला प्रामुख्याने रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,महामंत्री रींकेश चवरे,मंडळ अध्यक्ष राहुल किरपान,योगेश वादिभस्मे,संजय गुप्ता, ज्येष्ठ भाजपा नेते सदानंद निमकर,संजय मुलमुले,जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजेश ठाकरे,मनोहर पाठक,गुरुदेव चकोले,जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे,सतीश डोंगरे,

पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे,पंचायत समिती उपसभापती खेमराज चापले,पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम,ज्ञानेश्वर ढोक,उमेश पटले,राज हरणे,नंदकिशोर कोहळे,अतुल हजारे,योगेश मात्रे,बैजू खरे,किशोर रहांगडाले,रामा अडामे,उज्वला धमगाये,कविता मुलमुले,आलोक मानकर,सागर सायरे सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: