Monday, May 6, 2024
Homeराज्यमारवाडी युवा मंचच्या नागपूर शाखेला श्रेष्ठ शाखा पुरस्कार...

मारवाडी युवा मंचच्या नागपूर शाखेला श्रेष्ठ शाखा पुरस्कार…

Share

नागपुर – शरद नागदेवे

जालना येथे संपन्न झालेल्या मारवाड़ी युवा मंचाच्या प्रांतीय अधिवेशनात मारवाडी युवा मंच नागपूर शाखेला श्रेष्ठ शाखा म्हणून पुरस्कृत करण्यात आले. मारवाडी युवा मंच नागपूर शाखे द्वारे वर्षभर वॉकेथॉन,ब्लॅक अँड व्हाईट ( सुगम संगीताचा कार्यक्रम ), दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, योग गुरु राम खांडवे गुरुजी यांचा सत्कार, धरती धोरारी हा राजस्थानी गीत व नृत्याचा कार्यक्रम आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याचीच दखल घेऊन जालना येथे झालेल्या मारवाडी युवा मंचच्या प्रांतीय अधिवेशनात नागपूर शाखेला श्रेष्ठ शाखा म्हणून पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री जयप्रकाश मुँधड़ा, माजी मंत्री रमेशचंद्र बंग.राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र भट्टड़, राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा, प्रांतीय अध्यक्ष उमेश पंचारिया, प्रांतीय संघटन मंत्री वीरेंद्रप्रकाश धोका, माजी अध्यक्ष निकेश गुप्ता, सुनील खबिया नवनियुक्त प्रांतीय अध्यक्ष कैलास राठी, मारवाडी युवा मंच विदर्भ प्रमुख महेश बंग, कनैया मंत्री,हेमंत शर्मा,शरद राठी आदी प्रामुख्याने उपस्थित होते


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: