Homeमनोरंजनअंतराळात शूट केलेला पहिला चित्रपट 'द चॅलेंज' चा जबरदस्त ट्रेलर रिलिज... पाहा...

अंतराळात शूट केलेला पहिला चित्रपट ‘द चॅलेंज’ चा जबरदस्त ट्रेलर रिलिज… पाहा व्हिडओ

Share

इंटरनॅशनल स्पेसवर चित्रित झालेल्या ‘द चॅलेंज’ चित्रपटाची प्रतीक्षा आता संपली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिम शिपेन्को यांनी केले आहे. फीचर फिल्मचा पहिला सीक्‍वेन्‍स ऑक्‍टोबर 2021 मध्‍ये जवळपास दोन आठवड्यांच्‍या कालावधीत स्‍पेस स्‍टेशनवर शूट करण्‍यात आला.

हा चित्रपट रशियन स्पेस एजन्सी Roscosmos आणि चॅनल वन यांचा संयुक्त प्रकल्प आहे. यलो, ब्लॅक अँड व्हाईट हा चित्रपट स्टुडिओ आणि मध्यवर्ती भागीदारी आहे. हा चित्रपट 12 एप्रिल 2023 ला रिलीज होणार आहे.

जगातील पहिला इतिहास घडवणारा चित्रपट बनला आहे. ‘द चॅलेंज’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला कठोर प्रशिक्षण देण्यात आले होते. ‘चॅलेंज’चे वेगवेगळे सीन शूट करण्यासाठी, चित्रपटाच्या टीमने 12 दिवस अंतराळात ISS वर 35-40 मिनिटांचा दीर्घ सीन शूट केला. जे खूप मनोरंजक आहे.

त्यामुळे अवकाशात ‘चॅलेंज’ चित्रपटाचे शूटिंग करून इतिहास रचताना रशियाने हॉलिवूडचा दिग्गज टॉम क्रूझला मागे टाकले आहे. खरं तर, 2020 मध्ये टॉमने नासा आणि एलोन मस्कची कंपनी स्पेस एक्स यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळात एका चित्रपटाच्या शूटिंगची घोषणा केली होती.

हा चित्रपट एका महिला डॉक्टरची कथा आहे जी अंतराळवीराला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाते ज्याला अंतराळातच त्वरित ऑपरेशनची आवश्यकता असते. ISS वरील अंतराळवीर, Anton Shkaplerov आणि Pyotr Dubrov, देखील चित्रपटाच्या या दृश्यात छोटी भूमिका साकारतात. तर, स्पेस स्टेशनमध्ये सहा महिन्यांहून अधिक काळ घालवलेल्या नोवित्स्कीने या चित्रपटात आजारी अंतराळवीराची भूमिका केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: