Monday, December 11, 2023
Homeराज्यशितलवाडी टी पॉईंट येथे जागतीक आदिवासी दिनानिमीत्य उसळला आदिवासी जनसागर...

शितलवाडी टी पॉईंट येथे जागतीक आदिवासी दिनानिमीत्य उसळला आदिवासी जनसागर…

Spread the love

उत्साहात साजरा केला जागतीक आदिवासी दिन…गुणवंत विद्यार्थ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा केला सत्कार…जि.प. सदस्य हरीष उईके यांची उपस्थिती

राजु कापसे
रामटेक

शहरापासुन अवघ्या २ कि.मी. अंतरावर असलेल्या शितलवाडी टी पॉईंट येथे श्री लॉन येथे आज दि. ९ ऑगस्टला आदिवासी जनसमुदायातर्फे जागतीक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने बोथिया पालोरा – उमरी सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य तथा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीष उईके हे उपस्थित होते.

साजरा करण्यात आलेला हा कार्यक्रम ऑल इंडीया आदिवासी एम्लाईज फेडरेशन शाखा रामटेक, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आदिवासी कृती समिती व आदिवासी महिला मंडळ शितलवाडी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आलेला होता. कार्यक्रमात तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी आवर्जुन हजेरी लावली होती. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला दुपारी १२ वाजता दरम्यान आदिवासी बांधवांची भव्य रॅली काढण्यात आली होती.

कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या १० वी तथा १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातुन उपस्थित नागरीकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थितांमध्ये बोथिया पालोरा – उमरी सर्कल चे जिल्हा परिषद सदस्य तथा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हरीष उईके, माजी सभापती दुर्गाताई सरीयाम, महेश बमनोटे, पं . स. सदस्य रामकृष्णा वरखडे, सरपंच उमेश भांडारकर, बंडु अडमाची, मधु वरखडे, विजय कोकोडे, साधुरामजी वरखडे, अशोक उईके यांचेसह शेकडो आदिवासी बांधव उपस्थीत होते.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: