Friday, May 17, 2024
Homeराज्यमनसे रामटेक व पारशीवनी तालुक्या अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...

मनसे रामटेक व पारशीवनी तालुक्या अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या…

Share

रामटेक – राजु कापसे

मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले संघटन बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून मा. सचिनजी नागपूरकर मनसे जिल्हा संघटक नागपूर यांच्या नेतृत्वाखाली व मनसे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मा.रोशनजी फुलझेले तसेच मनसे रामटेक तालुका अध्यक्ष मा. सेवक बेलसरे यांच्या एकत्रित सहयोगाने दि.१७/०८/२०२३ रोज गुरूवार ला. श्री रामजानकी सभागृह रामटेक येथे तालुक्या अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

श्री राकेश (रॉकी) चवरे, श्री मंगेश ठाकरे, श्री प्रफुल्ल पुसदेकर व श्री शुभम दोंदलकर या चौघांची मनसे उपतालुका अध्यक्ष रामटेक पदी त्यांच्या कार्यक्षेत्रा नुसार नियुक्ती करण्यात आली. तसेच रामटेक तालुक्या अंतर्गत येणाऱ्या मनसर पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी श्री. विक्की धुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली.

त्याच प्रमाणे पारशिवनी तालुक्या अंतर्गत श्री पंकज (विक्की) नांदुरकर यांची पारशिवनी मनसे उपतालुका अध्यक्ष पदी, श्री शेखर केळवदे यांची पारशिवनी मनसे शहर अध्यक्ष पदी, श्री मंगेश कुंभारे यांची मनसे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख करंभाड पदी व श्री संदीप मेश्राम यांची मनसे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गोंडेगाव पदी नियुक्ती करण्यात आली.

सदर प्रसंगी मनशेसे नागपुर जिल्हा अध्यक्ष श्री सुरेशजी वांदीले, मनशेसे रामटेक तालुका अध्यक्ष श्री अनिवेश देशमुख, मनशेसे पारशिवनी तालुका अध्यक्ष श्री प्रदीप मनगटे, माजी मनसे रामटेक तालुका अध्यक्ष श्री अनिलजी मूलमुले व माजी मनसे रामटेक तालुका अध्यक्ष रतनजी वासनिक प्रामुख्याने उपस्थीत होते.

त्याच प्रमाणे श्री मयूरजी तळेगावकर, श्री अमितजी बादुले, श्री प्रशांतजी डोंगरे, श्री आशिषजी घरजाळे, श्री प्रदीपजी मेश्राम, श्री मनोजजी येळणे, श्री विद्याराजजी डोंगरे, श्री रुपेशजी वंजारी तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: