Thursday, April 25, 2024
Homeराज्यसैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले...

सैनिक कल्याण विभागाच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविले…

Share

अकोला – संतोषकुमार गवई

सैनिक कल्याण विभागातर्फे क वर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यात असून, त्यासाठी माजी सैनिक उमेदवारांनी दि. 3 मार्चपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिका-यांनी केले आहे.

विभागाच्या विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतील 40 कल्याण संघटक, 17 वसतिगृह अधिक्षक, 1 कवायत प्रशिक्षक, 1 शारिरिक प्रशिक्षण निदेशक आदी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांनी अर्ज करावेत.

वसतिगृह अधिक्षिका या पदासाठी भारताच्या सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील दिवंगत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होत नसतील तर सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांपैकी 1 पद हे अपंग संवर्गातुन किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: