Homeराज्यकृ.उ.बा. समीतीची वर्षीक सर्वसाधारण सभा व शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम थाटात संपन्न...

कृ.उ.बा. समीतीची वर्षीक सर्वसाधारण सभा व शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम थाटात संपन्न…

Share

रामटेक – राजू कापसे

कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा व शेतकरी मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज दि. १२ सप्टेंबर ला शहरातील गंगाभवनम सभागृहात थाटात पार पडली.

यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी राज्यमंत्री सुनील केदार, प्रमुख पाहुणे म्हणुन काँग्रेस चे नागपुर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र मुळक व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान तथा विविध पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी ११ वाजतादरम्यान माता सरस्वती व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम पार पडला. यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरु झाला.

यात जी.प. सदस्या शांता कुंभरे यांनी उपस्थित आमदार सुनील केदार यांना संबोधुन पुर्वीच्या निवडणुकींचा जुना इतिह्यास लोकांपुढे मांडत सुनील केदार यांचेसोबत आलेले अनुभव हसत हसत लोकांना सांगीतले तसेच लोकांना वाटत असेल तरी केदार साहेब आणि माझे अंतर्गत मतभेद मुळीच नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रपाल चौकसे यांनी शेतकर्‍यांना आर्थिकदृष्या मजबुत करायचे असेल तर त्यांनी विविध कुटीर उद्योगाचा अंगीकार करावा.

सिताफळाच्या गर चा साठा तयार करून तो आईस्क्रीम कंपन्यांना विकावा, त्यातुन उत्पन्न मिळेल. शेतकर्‍यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा असे चंद्रपाल चौकसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले. राजेंद्र मुळक शेतकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंद्याचा अंगीकार करावा यामुळे त्यांना आर्थिक स्वरूपाचा आधार मिळेल. येथे शेतकरी भवन बनले पाहीजे.

सभापती सचिन किरपान यांनी आमदार सुनिल केदार यांचे नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चा विकास या पाच वर्षात घडवुन आणावा असे मुळक यांनी बोलतांना सांगितले. पंचायत समिती च्या पशुसंवर्धन अधिकारी तथा त्यानंतर तालुका कृषी कार्यालयाचा नुकताच कार्यभार स्विकारणारे तालुका कृषी अधिकारी राऊत सर यांनी उपस्थीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की प्रधानमंत्री शुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत शेतकरी विविध व्यवसायाद्वारे आपले आर्थिक उत्पन्न वाढवु शकतो.

दुधाचे व्यवसाय करू शकतो. त्याचप्रमाणे फळपिकापासुन उद्योग उभारू शकतो. फळपिकांसाठी शासनांकडुन विविध योजना राबविण्यात येत आहे. शेतकर्यांनी गटशेतीचा अंगीकार करावा. शेतीपयोगी विविध यंत्र ५० % अनुदानावर उपलब्ध आहे त्यासाठी अल्पशा कागदपत्रांची पुर्तता करून याचा शेतकऱ्यांना लाभ घेता येऊ शकते.

तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयात येवुन या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी बोलतांना तालुका कृषी अधिकारी योगेंद्र राऊत यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा भाषणाचा कार्यक्रम झाला.

यात आमदार सुनील केदार, राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे, देवेंद्र गोडबोले, शांता कुंभरे तथा कृ.उ.बा. सभापती सचिन किरपान यांनी आपल्या भाषणातुन उपस्थित शेतकर्‍यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमात उपस्थित सरपंच मंडळींचा शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. संचालन त्रिलोक मेहर यांनी केले.

आभार प्रदर्शन नकुल बरबटे यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये आमदार सुनील केदार, नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजेंद्र मुळक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक चे सभापती सचिन किरपान, उपसभापती लक्ष्मीताई कुंभरे, देवेंद्र गोडबोले, जि.प. सदस्य शांता कुंभरे, विरेश आष्टणकर, अशोक चिखले, राजु कुसुंबे तथा संचालक मंडळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: