Thursday, May 2, 2024
Homeराज्यअंगणवाडी मदतनीस पदभरती यादीत आक्षेप असल्यास १ सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन...

अंगणवाडी मदतनीस पदभरती यादीत आक्षेप असल्यास १ सप्टेंबरपर्यंत कळविण्याचे आवाहन…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर या कार्यालयातील अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यात येत आहेत. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून 10 जुलै 2023 पर्यत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने पात्र अपात्र उमेदवारांची यादी http://nanded.gov.in या संकेतस्थळावर 21 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. तरी प्रसिध्द यादीबाबत काही आक्षेप असल्यास 1 सप्टेंबर 2023 पर्यत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर कार्यालयात लेखी पुराव्यासह अर्ज सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नांदेड शहर वि.सि. बोराटे यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: