Saturday, May 4, 2024
Homeराज्यआणि 'ती' महिला सुखरूप घरी पोहचली, दहीहंडा पोलिसांची कामगिरी...

आणि ‘ती’ महिला सुखरूप घरी पोहचली, दहीहंडा पोलिसांची कामगिरी…

Share

पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांचा सन्मान

दहीहंडा – दुपारची भर उन्हाची वेळ… एक मानसिक स्वास्थ बिघडलेली महिला अनवाणी पायाने रस्त्याने फिरत होती… तिला वेडसर म्हणून लोक तिची हेळसांड करत होते… ती सैरावैरा पळत होती… तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता… किंवा आघटितही घडले असते… मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशीच घटना दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या महिलेला पोलिसांनी घरी सुखरूप सोडताच तिचे आनंदाश्रू गगनात मावत नव्हते.

सविस्तर माहितीनुसार, याबाबत हकीकत अशी की एक मानसिक स्वास्थ बिघडलेली महिला रस्त्याने फिरत आहे अशी माहिती चालक प्रवीण पेठे यांना करतवाडी रेल्वे निवासी मनोज रायबोले यांनी दिली. याबाबत पोलीस पेठे यांनी रायबोले या व्यक्तीला सांगितले की “त्या महिलेकडे लक्ष ठेवा आम्ही लवकरच पोहचत आहे.”

या महिलेच्या जीवाला धोका होऊ नये किंवा तिच्यासोबत काही अघटीत घडू नये म्हणून याची तत्काळ दखल घेत प्रवीण पेठे यांनी ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांना सदर माहिती दिली. ठाणेदार ठाकरे यांनी याबाबत दामिनी पथकाला तत्काळ पाचारण करण्यास सांगितले.

तसेच बीट जमादार अघडते आणि शिरसाट यांनाही ठाणेदार ठाकरे यांनी याबाबत तत्काळ दखल घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर दामिनी पथक आणि पोलीस कर्मचारी व चालक प्रवीण पेठे यांनी चौहट्टा बाजार परिसरात असलेल्या या महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिला विश्वासात घेत तिची पोलीस विचारपूस करत होते.

दरम्यान ही महिला पोलिसांना दगड मारण्याची भीती दाखवत होती. पोलिसांनी संयम ठेवत तिला अल्पोपहार देत तिची खातीरदारी केली. तब्बल १० तासानंतर या महिलेने तिचे मूळ गावाची माहिती दिली. ही महिला अकोट तालुक्यातील अंबोडा झिंगवाडी येथील असल्याचे तिने सांगितले.

त्यानंतर पोलीस नायक चालक प्रवीण पेठे हवालदार अघडते, शिरसाट, दामिनी पथकातील महीला कर्मचारी ऋतुजा जाधव या सर्व टीमने पोलीस ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेला तिच्या घरी सुखरूप पोहचविले. या महिलेच्या कुटुंबियातील लोकांनीही दहीहंडा पोलिसांचे आभार व्यक्त केले.

या संपूर्ण घटनेची व कर्तव्याची दखल घेत अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. हा सन्मानमुळे आमचे मनोबल वाढले असल्याची भावना यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच बळ मिळेल : पोलीस अधीक्षक

दहीहंडा पोलीस स्टेशनची सूत्रे हाती घेताच पोलीस ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी व अंमलदार यांच्या कर्तव्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट पोलीस म्हणून अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारामुळे पोलिसांना अधिक चांगले काम करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी नक्कीच बळ मिळेल अशी आशा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी व्यक्त केली.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: