Thursday, May 9, 2024
Homeराज्यमिनल श्रीकांत पाचकवडे यांना आनंदी स्त्री गौरव पुरस्कार...

मिनल श्रीकांत पाचकवडे यांना आनंदी स्त्री गौरव पुरस्कार…

Share

अकोला येथील निशा मेकओव्हर च्या संचालिका सौ. मिनल श्रीकांत पाचकवडे यांना आनंदी स्त्री गौरव पुरस्कार-२०२३’ ने सन्मानित करण्यात आले आहे. आनंदी गुरुकुल अॅक्टिंग अकॅडमी,अकोला यांच्या वतीने ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून शिक्षण, सामाजिक, राजकीय, उद्योग, कला, साहित्य, प्रशासन, पत्रकारिता, नाट्य, अभिनय, सांस्कृतिक, नृत्य,चित्रकला तसेच विविध क्षेत्रातील कर्तबगार व कर्तृत्ववान महिलांना ‘आनंदी स्त्री गौरव पुरस्कार-२०२३’ साठी ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात आले होते.

त्यानुसार अकॅडमी तर्फे दि. 15 मार्च रोजी ऑनलाइन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अकोला येथील निशा मेकओव्हर च्या संचालिका सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सौ. मिनल श्रीकांत पाचकवडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराबद्दल मिनल पाचकवडे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: