Friday, May 3, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | मंगलधाम परिसरात पुन्हा दोन बिबट्याचा वावर...घटना CCTV कॅमेऱ्यात कैद...

अमरावती | मंगलधाम परिसरात पुन्हा दोन बिबट्याचा वावर…घटना CCTV कॅमेऱ्यात कैद…

Share

अमरावतीच्या मंगलधाम परिसराच्या श्रीनिवास अपार्टमेंट व गणेशा व्हिला समोर पुन्हा दोन बिबट्या आढळून आल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील बिबट्याचा वावर कॅमेऱ्यात कैद झालाय. मागील आठवड्यात याच बिल्डींग समोर दोन बिबट समोर बिन्दास्त वावर करीत असल्याचे कॅमेर्यात कैद झाले होते तर आता तेच बिबटे पुन्हा एकदा बिल्डींगच्या CCTV कॅमेर्यात कैद झाले आहे.

शहरातील नागपूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या मंगलधाम परिसरात नेहमीच बिबट असल्याचे अनेकदा समोर आले आहे. तर काल रात्री १ वाजताच्या सुमारास श्रीनिवास अपार्टमेंटच्या बिल्डींग समोर दोन बिबटे आरामात वावर करीत असताना येथील नागरिकांना दिसले. एक निर्मलधाम बिल्डींगच्या रस्त्यावर मस्त चालत असताना तर दुसरा श्रीनिवास बिल्डींग समोरील सर्विस लाईट च्या खाली आरामात बसला होता.

विशेष म्हणजे मुख्य रोडला लागून तीन अपार्टमेंट आहेत, तिन्ही बिल्डींगचा रस्ता एकच असल्याने नागरिकांची ये-जा याचा रस्त्याने असते मात्र सुदैवाने रात्री काही घडले नाही.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: