Saturday, May 4, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । दत्तक पुत्रच निघाला चोर…पोलिसांनी २४ तासात केली अटक…

अमरावती । दत्तक पुत्रच निघाला चोर…पोलिसांनी २४ तासात केली अटक…

Share

अमरावती – घराची इसार चिठठी केलेली दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम दत्तक चोरून नेल्याची घटना शुक्रवारी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील उत्तमनगर मध्ये समोर आली या चोरी प्रकरणी पोलिसांनी दत्तक पूत्र यास ग्राम माटोडा ता.मूर्तिजापूर येथून अटक केली आहे.

माहितीनुसार दिनांक 29/07/2022 यातील फिर्यादी तानाबाई पामाजी वानखडे वय 64 वर्ष रा . उत्तमनगर गल्ली नं .2 अमरावती यांनी पोलीस स्टेशनला तकार दिली की त्यांनी त्यांचे राहते घराची विक्री बाबत इसार चिठठी केली आहे. इसार मध्ये मिळालेले 2,000000 /- रुपया पैकी 1,70000 /- रुपये राहते घरात लोखंडी पेटीत कूलूप लावून ठेवले होते.ते व त्यांचा मोठा भाऊ यांचे हाताला दुखत असल्याने त्यांचे हाताला लेप लावण्या करीता 11.00 वाजता यशोदा नगर अमरावती येथे गेली असता, राहते घरी तिचे दोन लहान नातू घरी हजर होते .

त्यानंतर फिर्यादी हिचा दत्तक पूत्र जो आपले पत्नीसह ग्राम माटोडा ता.मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे राहतो. त्याने फिर्यादीचे घरी येवून लहान मूलांना पिण्या करीता पानी मागून फिर्यादी व कोणीही प्रौढ व्यक्ती घरी हजर नसल्याचा फायदा उचलून घरात ठेवलेली लोखंडी पेटीचे कूलूप तोडून आत मध्ये ठेवलेले नगदी , 1,70000/- रुपये घेवून पसार झाला असल्याची तक्रार फेजरपुरा पोलीस स्टेशनला दिली होती.

अशा फिर्यादी चे जबानी रीपोर्ट वरुन आरोपी विरुध्द सदरचा गून्हा कं .कलम 380 भा.द.वी.प्रमाणे दाखल करून तपासात घेतला. गुन्हयातील नमूद आरोपी व चोरीस गेलेल्या मुददेमालचा शोध घेणे करीता पो.स्टे. चे डिबी पथक पोउपनि गजानन राजमलु , पोहेकॉ योगेश श्रीवास व टिम त्यांनी तात्काळ रित्या गुन्हयाचा तपास करून गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून त्याचे राहते गावात जावून आरोपी नामे रोशन वानखडे वय 23 वर्ष यास गुन्ह्यात अटक करून त्याचे घरातून झडती मध्ये 1,670000/- रुपये नगदी जप्त करण्यात आले आहे .

त्यामधील 3,0001 / – रुपये आरोपी याने स्वतः करीता खर्च केल्याची कबुली दिली आहे . सदर कार्यवाही डॉ.आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती शहर , पोलीस उपायुक्त सा परिमंडळ – 01 , अमरावती शहर व मा.स.पो. आ. फेजरपुरा विभाग अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि.अनिल एन. कुरळकर , पोउपनि गजानन राजमलु , पो.हे. कॉ. योगेश श्रीवास , ना.पो.कॉ. हरीश बुंदेले, श्रीकांत खडसे , पो.कॉ. धनराज ठाकुर, अनुप झगडे यांचे पथकाने केली आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: