Sunday, April 28, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | म्हणूनच त्याने आई व भावाला संपवलं...मोर्शी येथील दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी...

अमरावती | म्हणूनच त्याने आई व भावाला संपवलं…मोर्शी येथील दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केला उलगडा…

Share

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी शहरातील शिवाजी नगर संकुलात दोन मुलांसह राहणाऱ्या महिलेचा व तिच्या लहान मुलाचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून घराच्या दिवाणात लपवून ठेवल्याच्या प्रकरणाने शुक्रवारी सायंकाळी एकच खळबळ उडाली होती. घटनेपासून मृताचा मोठा मुलगा बेपत्ता आहे. मृत महिलेच्या आईने (आजी) तिच्या फरार नातवाबद्दल भीती व्यक्त केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेणेकामी गोपनीय यंत्रणा सक्रिय करून सदर मुलाचा शोध घेवून त्यास चौकशी करीता हैद्राबाद (तेलंगाणा) ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०१/०९/२०२३ रोजी पोलीस स्टेशन मोशी येथे फिर्यादी नामे सौ. गोदाबाई बबनराव बेलगे, रा. रामनगर कोंढाळी यांनी फिर्याद दिली की, त्याची मुलगी नामे श्रीमती निलीमा गणेश कापसे, वय ४८ वर्ष, रा. शिवाजी नगर मोर्शी ही त्यांचे नातु नामे १) आयुष गणेश कापसे, वय २० वर्षे व २) सौरभ गणेश कापसे, वय २४ वर्षे हयांचे सोबत तीचे पती मरण पावले तेव्हा पासुन त्यांचे स्वतःचे शिवाजी नगर, मोशी येथील मालकीचे घरात राहत होती. तसेच वनविभागात कंत्राटी पध्दतीवर संगणक परिचालक म्हणुन काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करित होती.

फिर्यादी यांचे नियमीतपणे त्यांची मुलगी व नातवंड यांचे सोबत मोबाईलव्दारे बोलणे असायचे परंतु मागील ०५-०६ दिवसांपासुन फिर्यादी, त्यांची सुन व मुलगा यांनी श्रीमती निलीमा गणेश कापसे व त्यांचे दोन्ही मुलांचे मोबाईलवर संर्पक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल सतत बंद असल्याचे दाखवीत होते. करिता दि. ०१/०९/२०२३ रोजी फिर्यादी हया त्यांचे पतीसह काटोल वरून मोर्शी येथे आल्या व त्यांच्या मुलीच्या घरी जावुन पाहणी केली असता पुढील दरवाजा आतून बंद असल्याचे व घराचे मागील दरवाज्याला कुलुप लावलेले दिसले वरून त्यांनी आजु-बाजुचे लोंकाना विचारपुस केली असता तेथील लोकांनी त्यांचे मुलीला व नातवंडा मागील ७-८ दिवसांपासुन पाहीले नसुन घर बंद सल्याचे सांगीतले.

सदर फिर्यादी यांना घराजवळ अत्यंत दुर्गंध येत असल्याने संशय आला म्हणुन त्यांनी शेजारील लोकांचे मदतीने घराचे कुलूप तोडुन प्रवेश केला असता घरात अती दुर्गंध व माश्या असा विचीत्र दृश्य दिसताच आजु-बाजुचे लोकांनी पोलीसांना माहीती दिली असता त्वरीत घटनास्थळावर ठाणेदार पो.स्टे. मोशी पथकास दाखल झाले. पोलीसांनी सदर घराची पाहणी केली असता घरातील लाकडी दिवाण मध्ये दोन विच्छीन्न अवस्थेत मृतदेह आढळुन आले. सदर मृतदेह फिर्यादी यांची मुलगी श्रीमती निलीमा गणेश कापसे, वय ४८ वर्ष, रा. शिवाजी नगर व नातु नामे आयुष गणेश कापसे, वय २० वर्षे यांचे असल्याचे फिर्यादी यांनी ओळखले. सदर घटनचे अनुषंगाने व फिर्यादीचे तक्रारी वरून पो.स्टे. मोर्शी येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटना स्थळावर न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक, श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा तज्ञ यांना सुध्दा पाचारण करून उपलब्ध भौतीक तसेच परिस्थितीजन्य पुरावे तपास कामी संकलीत करण्यात आलेले आहेत. मृतकांचे शवविच्छेदन मोर्शी उप-जिल्हा रूग्णालय येथे करण्यात आल्यानंतर मयतांचे अंतीम संस्कार नातेवाईकांनी केलेले आहे.

घटनेच्या दिवसापासून यातील मयत हिचा मोठा मुलगा सौरभ गणेश कापसे हा गायब होता. सदरमुलाचा कसोशीने शोध घेण्यात येत होता. आरोपी सौरभ वाला मोबाईलचे संपूर्ण ज्ञान असुन त्याचे मोशी येथे काही दिवसांपूर्वी मोबाईल दुरुस्तीचे दुकान सुध्दा होते, म्हणुन त्याने पसार होताच स्वतःचा मोबाईल बंद करून ठेवला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सौरभचा शोध घेणेकामी गोपनीय यंत्रणा सक्रिय करून सदर मुलाचा शोध घेवून त्यास चौकशी करीता हैद्राबाद (तेलंगाणा) ताब्यात घेतले आहे. सदर मुलास अमरावती येथे आणुन विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने कथन केलेली घटना खालील प्रमाणे.

मयत श्रीमती निलीमा गणेश कापसे, वय ४८ वर्ष, रा. शिवाजी नगर व लहान मुलगा नामे आयुष गणेश कापसे, वय २० वर्षे व आरोपी सौरभ गणेश कापसे हे त्याचे वडीलांचे मृत्यु नंतर मोर्शी येथे राहत होते. त्याची आई कंत्राटी तत्वावर पंचायत समिती मोशी येथे काम करून उदरनिर्वाह सुरु होता. लहान भाऊ आयुष हा अमरावती येथील महाविद्यालयात शिकत होता. तसेच आरोपी सौरभ हा त्याचे ईलेक्ट्रीकल मध्ये नागपुर येथून पदविका पूर्ण करुन सार्वजनिक बांधकाम अमरावती येथे शिकाऊ तत्वावर काम करीत होता. या दरम्यान दोघेही भाऊ बराच कालावधी करीता घराबाहेर राहत असत. त्यावेळी त्याच्या घरी ओळखीतील काही लोकांचे येणेजाणे असायचे. यातूनच सौरभ वाला त्याची आई मयत निलीमा हिचे चारित्र्यावर संशय आला व त्याने या बद्दल कोणालाही वाच्छता न करता सदरचा राग मनातच ठेवला. सौरभ याने त्याचे आईला संपविण्याचा निर्णय घेतला. सौरभ याचे अनेक मित्र हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने व त्यांच्या भेटीगाठी असल्याने सौरभ वाला औषधींचे थोडे बहुत ज्ञान होते.

त्यानंतर सौरभ याने इंटरनेटचा वापर करून सोशल मिडीयावर विविध व्हिडीओ पाहून एखादया व्यक्तीची हत्या करण्याच्या विविध पध्दतीचा अभ्यास केला. तसेच हत्येकरीता वापरण्यात येणारी औषधी वनस्पती इत्यादीचा सविस्तर अभ्यास केला. त्यानंतर ऑनलाईन पध्दतीने अशी काही औषधी वनस्पती जीचा अतिसेवनामुळे सदर वनस्पतीचे विषामध्ये रुपांतर होते मागविली होती आणि ती जेवणात आई व भावाला देण्याचा प्रयत्न होता. परंतु सदरचा प्रकार त्याला यशस्वी करता आला नाही.

त्यानंतर त्याने वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांचे औषधी परवाना कागदपत्रांची झेरॉक्स हस्तगत करून इंटरनेटवर केलेल्या शोधाप्रमाणे काही गुंगीकारक औषधी, शस्त्रक्रियेदरम्यान भुल देण्याकरीता वापरण्यात येणारी औषधी, झोपेच्या औषधी यांची खरेदी केली. त्यानंतर बुधवार दिनांक २३/८/२०२३ रोजी सकाळी त्याने धोतरा या वनस्पतीच्या फळातील बिया या विषारी असल्याचे त्याला माहित असल्याने त्याने सदर बियांची पावडर तयार करुन आई व भावाची नजर चुकवून घरात बनविण्यात आलेल्या भाजीत सदर पावडर मिसळविली, त्यानंतर त्याची आई व भाऊ जेवणाचा डब्बा घेवून कामावर व महाविद्यालयात निघुन गेले. त्याच दिवशी दुपारी त्याचे आईचा त्याला फोन आला की, जेवणानंतर तिला व त्याच्या भावाला चक्कर व अंधारी सारखे वाटत आहे. त्यानंतर आरोपी हा पंचायत समिती येथे जावून त्याच्या आईला घरी घेवून आला. दरम्याच्या काळात त्याचा लहान भावाना सुध्दा महाविद्यालयात चक्कर आल्याचे समजले व तो सुध्दा अमरावती वरून घरी परतला. त्यानंतर आरोपीताने दोघांनाही स्थानिक दवाखान्यात नेले. तेथे धातुरमाथुर औषोधोपचार करुन घरी आणले.

आई व भावाला तुम्हाला अशक्तपणा आला असल्याने सलाईनची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर तुम्ही घरीच थांबा मी काही व्यवस्था करतो असे सांगुन घराबाहेर पडला व त्याच्या ओळखीतील आरोग्य सेवक (कम्पांऊडर) म्हणुन खाजगी काम करणाऱ्या एका मित्रास बोलावून त्याला आई व भाऊ यांना अशक्तपणा असल्याचे सांगुन घरीच सलाईन लावण्याची विनंती केली. सदर मित्राने घरी येवून नियमीतपणे रुग्णांना लावण्यात येणान्या सलाईन मयत व तिचा लहान मुलगा यांना त्यांचेच घरी दिवाणवर लावून दिल्या होत्या व सलाईन संपेतोवर तेथेच थांबतो म्हणुन सांगितले. परंतु आरोपीने तु जा मी माझ्या दुसऱ्या एका आरोग्य सेवक (कम्पांऊडर) मित्राला बोलावून सलाईन काढून घेईल असे सांगुन त्याला घरुन पाठवून दिले.

त्यानंतर आरोपीने स्वतः इंटरनेवर शोध घेतल्याप्रमाणे व मित्रांचे कागदपत्रांची झेरॉक्स हस्तगत करुन खरेदी केलेली गुंगीकारक औषधी, शस्त्रक्रियेदरम्यान भुल देण्याकरीता वापरण्यात येणारी औषधी, झोपेच्या औषधी इत्यादी त्याचे आई व भावाला कळू न देता सलाईनमध्ये इंजेक्शनद्वारे टाकली व तो तेथेच थांबुन राहिला. मयत आई व भाऊ यांनी कुठलाही त्रास व प्रतिकार न करता झोपी गेले व झोपेतच औषधींच्या अति डोजमुळे त्यांचा झोपेतच मृत्यु झाला.

दोघांचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीने दोघांचे शवांचे दुर्गंध पसरु नये करीता स्थानिक बाजारातून प्लॅस्टीक तडव आणुन त्यात गुंडाळून घराच्या लाकडी दिवाणमध्ये टाकून त्यावर गादी, ब्लॅकेट टाकून दिवान बंद करुन घराला कुलुप लावून घराला कुलुप लावून पसार झाला. घरातून जाते वेळी त्याने वापरण्यात आलेले सलाईन व औषधी या सर्व सोबत घेवून गेला होता.

सदर आरोपी घरातून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा घरी परतला होता. तसेच त्याने मयत आई व भाऊ यांना पाहिले सुध्दा व त्यानंतर तो घरातून बाहेर निघला व अमरावती, मोर्शी इत्यादी ठिकाणी फिरत राहिला. त्याचेवर तो गायब असल्याने पोलीसांचा संशय बळावला होता वरुन त्याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे ताब्यातून औषधी जप्त करण्यात आली आहे.

तसेच आरोपी हा अमरावती येथून निघुन गेल्यानंतर विविध ठिकाणी त्यानेच तयार केलेले बनावट आधार कार्डचा वापर करून व नांव बदलवुन हॉटेल किंवा लॉज मध्ये निवास करित असल्याचे सांगत आहे पुढील तपास डॉ. श्री. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी हे करित आहेत.

सदर ची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोर्शी यांची मार्गदर्शनात पो. नि. श्रीराम लांबाडे, ठाणेदार, मोर्शी, श्री. किरण वानखडे, पो. नि., स्था.गु.शा. यांचे नेत्वृत्वातील पो.उप.नि.निजीन चुलपार, पोलीस अमंलदार संतोष मंदाणे, पंकज फाटे, सचिन मिश्रा, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, भूषण पेठे, शकील चव्हाण, शिवा शिरसाठ, रितेश वानखडे यांचे पथकाने केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: