Thursday, May 2, 2024
Homeराज्यअमरावती | ज्ञानमाता शाळेत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराची चौकशी करावी...हिंदुत्‍वनिष्ठ संघटना दिले...

अमरावती | ज्ञानमाता शाळेत विद्यार्थ्यांवर होणाऱ्या लैगिक अत्याचाराची चौकशी करावी…हिंदुत्‍वनिष्ठ संघटना दिले निवेदन…

Share

अमरावती : शहरातील इर्विन चौक येथील ज्ञानमाता शाळेच्या शिक्षकावर कोतवाली पोलिस ठाण्यात कलम ३५४, ८/१२ पोस्को नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मरियम ह्यांड्री जोसेफ असे त्या आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्यास रात्रीच ताब्यात घेतले आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी सदर कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार याच शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने आरोपी शिक्षक हा तीला नेहमीच बॅड टच करीत शोषण करीत असल्याचे तिच्या पालकांना सांगितले होते. त्यावरून पीडितेच्या पालकाने ११ सप्टेंबर रोजी मुख्याधापक यांना सदर गंभीर प्रकरणाची तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर शाळेच्या विशाखा समितीने सदर प्रकरणाची तक्रार पोलिसांत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी आरोपी शिक्षकाविरोधात कोतवाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या अनुशंगाने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की या शाळेतून नेहमीच पालकांकडून या विषयीची अशी माहिती मिळते की मुला मुलींना हिंदू पध्दतीने आचरण करणे, कुंकु, बिंदी लावणे तसेच मेहंदी काढणे याविषयी अडचणी आणल्या जातात. तसेच नेहमीच अशा लैगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे वैयक्तिकरित्या बोलले जाते. शाळा प्रशासनाकडून या विषयी आवश्यक कारवाई झाल्याचे लक्षात येत नाही. तसेच पालकांना मुलांच्या शिक्षणाची काळजी असेल्याने पालकांकडून बाहेर पोलिसात तक्रार करण्याचे प्रयत्न केले जात नाही. या मुळे असे प्रकार बाहेर उघडकीस येत नाहीत. तसेच मुलांच्या आजारपणात त्यांना काही तरी पाणी लावून बरे करण्याचे प्रकार केले जात असल्याची माहिती मिळत आहे. तरी याची पूर्ण चौकशी करून संबंधित शाळा प्रशासनावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

पूढील मागणी आम्ही करतो की,
१. मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करून असे प्रकार कायम स्वरूपी रोखण्यासाठी अशा शिक्षकांची कायम स्वरूपी निलंबन करणे आवश्यक वाटते.

२. शाळा प्रशासनाचा समन्वय राखून अशा प्रकारांना आळा घालण्यासंदर्भात तसेच हिंदु संस्कृतीचे आचरण करण्यास अडचणी जात असल्याच्या तक्रारी समोर येतात त्यासाठी शाळा प्रशासनास बोलावून त्याविषयीच्या सुचना करण्यात याव्यात.

३. पोलिस यंत्रणांना या विषयी सखोल तपास करण्यसाठीया साठी एक समिती नेमून पालक विद्यार्थी यांचा सहभाग घेऊन या माध्यमातून विद्यार्थी व पालक खाजगीत बोलून त्याविषयी अधिक माहिती मिळू शकते. व त्यामुळे यात असे अन्य प्रकारही समोर येण्याची शक्यता वाटते. कवल पांडे,प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय श्री राम सेना रेखा रीनवा, संजीवनी भोसले, जया बद्रे, नीता तिवारी, वृंदा मुक्तेवार, बरखा बोज्जे, रोशनी वाळके, मानसी साहू, दीक्षा सोनटक्के, हेमंत मालवीय, निलेश टवलारे, सतीश शेंद्रे, महेंद्र श्रीवास्तव, मानव बुद्ध देव, संगम गुप्ता,महानगर प्रमुख राष्ट्रीय श्री राम सेना अनिल शुक्ला, राष्ट्रीय श्री राम सेना विजय दुबे,राष्ट्रीय संयोजक प्रमेंद्र शर्मा, प्रदेश अध्‍यक्ष राष्‍ट्रीय श्रीराम सेना विवेक सोनी, मोहित साहू, संदीप चावरे, यश शर्मा,सूरज घारू, आशिष मिश्रा, कमल चावरे, पप्पू मिश्रा.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: