Thursday, May 2, 2024
Homeराज्यअमरावती | सराईत मोटार सायकल चोरटा स्था. गु.शा. चे जाळयात...

अमरावती | सराईत मोटार सायकल चोरटा स्था. गु.शा. चे जाळयात…

Share

राकेश रामराव भारसाकले, वय २३ वर्षे, रा. शहापुर, ता. वरूड, ह.मु. आष्टी, जि. वर्धा

अमरावती ग्रामिण जिल्हयातील वाढत्या मोटार सायकल (दुचाकी) चोरीच्या घटनांचा आढवा घेवून सदर घटनांवर त्वरीत प्रतिबंध करून घडलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा यांनी मार्गदर्शन करून आपले अधिनस्थ सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे.

दि.२८/०७/२०२३ रोजी स्था. गु. शा. चे पथक गुन्हेगार शोधकामी पो.स्टे. वरूड हद्दीत गस्त करित असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, वरूड परिसरात घडलेल्या दुचाकी चोरीच्या घटनात आरोपी नामे राकेश रामराव भारसाकले, वय २३ वर्षे, रा. शहापुर, ता. वरूड, जि. अमरावती याचा समावेश असुन तो स्वतःची ओळख लपवीण्याचे उद्देशाने आष्टी, जि. वर्धा येथे राहत आहे.

प्राप्त माहीतीची शहानिशा करून स्था. गु.शा. चे पथकाने सदर आरोपीबाबत इत्यंभूत माहीती प्राप्त करून सापळा रचुन सदर आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, आरोपीने पो.स्टे. वरूड तसेच पो.स्टे. शेंदुरजना घाट येथील ०२ दुचाकी चोरीच्या घटना केल्या असल्या बाबतची कबुली दिली.

सदर आरोपीचे ताब्यातून चोरीच्या गुन्हयातील ०२ दुचाकी किं. १,००,०००/- रूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कार्यवाही करिता वरूड पोलीसांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास वरूड पोलीस करित आहे. सदरची कारवाई मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक,

अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरिक्षक, स्था. गु.शा., अमरावती ग्रा. यांचे नेत्वृतातील श्री. नितीन चुलपार, पो.उप.नि., पोलीस अमंलदार संतोष मंदाणे, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, भुषण पेठे, रविन्द्र बावणे, पंकज फाटे, हर्षद घुसे यांचे पथकाने केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: