Monday, April 29, 2024
Homeराज्यअमरावती | मोर्शी येथील देशी दारू दुकानातील चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन...

अमरावती | मोर्शी येथील देशी दारू दुकानातील चोरीतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक…

Share

न्युज डेस्क – अमरावती ग्रामिण जिल्हयातील दि.१९/०८/२०२३ रोजी पो.स्टे. मोर्शी हद्दीत जयस्तंभ चौक येथील दि बेस्ट वाईन शॉपी मधील दिनांक १८/०८/२०२३ ते १९/०८/२०२३ दरम्यान अज्ञात आरोपीतांनी वाईन शॉपीचे चॅनल गेट तसेच शटर चे कुलुप तोडुन दुकानाच्या गल्ल्यातील ३०,००० /- रु रोख चोरुन नेली वरून पो.स्टे. मोर्शी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर घटनेचा आढावा घेवुन गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेण्याचा व गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी व अमंलदार यांना आदेशित केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयांचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन तसेच तांत्रिक पुराव्याच्या मदतीने माहीती मिळाली की, वरील गुन्हा हा आरोपी नामे १) रामसिंग गुलाब धुर्वे वय २४ वर्ष २) आकाश हरीशचंद्र नागवंशी वय २२ वर्ष दोन्ही रा. शहापुर ता.वरुड जि अमरावती यांनी त्यांचा दोन अल्पवयीन साथीदारासह केला आहे.

प्राप्त माहीतीची सत्यता पडताळुन मोर्शी उपविभागातील स्था.गु.शा. चे पथकाने नमुद आरोपीतांपैकी क्रमांक १) रामसिंग गुलाब धुर्वे वय २४ वर्ष रा . शहापुर ता. वरुड जि अमरावती यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. आरोपीतांस सखोल विचारपुस केली असता त्यांनी वर नमुद गुन्हयांची कबुली देवुन त्याचबरोबर यापुर्वी नमुद आरोपीतांनी काटोल
जि. नागपुर येथील सुध्दा देशी दारु चे दाकन फोडुन चोरी केल्याचे कबुली दिली आहे.

आरोपीतांनी एकुण ०२ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असुन नमुद आरोपीतांचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेल्या रकमेपैकी रोख ३,१५०/- रु व गुन्हयात वापरलेली दुचाकी १,००,०००/-रु असा एकुण १,०३,१५०/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीतास पुढील तपासकामी पो.स्टे. मोर्शी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा., मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक,अमरावती ग्रा, यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे पो. नि. स्था. गु.शा.यांचे नेतृत्वातील पो.उप.नि.नितीन चुलपार पोलीस अंमलदार संतोष मंदाने, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, भुषण पेटे, पकंज फाटे, चालक निलेश मेहरे यांचे पथकाने केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: