HomeBreaking Newsअमरावती | इतवारा बाजारातील दुकानाला भीषण आग…आगीत ४ दुकाने जळून खाक…

अमरावती | इतवारा बाजारातील दुकानाला भीषण आग…आगीत ४ दुकाने जळून खाक…

Share

अमरावती : शहरातील दाट वस्तीत असलेल्या इतवारा बाजार परिसरात गल्ली नं 4 मधील फळ बाजाराला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत 4 दुकाने जाळून खाक झाली आहेत, मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती मिळाली असून या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मात्र दुकानातील साहित्य जाळल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

येथे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते. सकाळी 4 वाजता ही आग आटोक्यात आणली असून जळालेल्या दुकानांचे मोठे नुकसान झाल्याचं समजते…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: