Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीअमरावती | बारमध्ये ३ ते ४ युवकांचा धुमाकूळ घालून बार मॅनेजरला ५०...

अमरावती | बारमध्ये ३ ते ४ युवकांचा धुमाकूळ घालून बार मॅनेजरला ५० हजारांची मागणी…गुन्हा दाखल…

अमरावती शहर हे विदर्भातील गुन्हेगारीसाठी नंबर १ चे शहर अशी ओळख निर्माण होत आहे, शहरातील काही भागातील काही अल्पवयीन मुलेही भाईगिरी, खंडणी, खून अश्या गंभीर गुन्ह्यात गुरफटत चालली आहे. अश्यातच गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील राठी नगर परिसरात असलेल्या सुरुची बार अँड रेस्टॉरंट मध्ये 30 जुलै च्या रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान 3 ते 4 युवक या रेस्टॉरंट मध्ये मद्यप्राशन केले.

तर सुरुची बार च्या मॅनेजर ने या युवकांना पैसे मागितले तर त्यांनी उलट त्या मॅनेजर ला दमदाटी करत म्हणाले की आम्ही पैसे देत नाही तर पैसे घेतो म्हणत आरोपी विक्की अंबरते उर्फ शूटर व अधिक 3 युवकांनी या सुरुची बार च्या मॅनेजर ला 50 हजार रुपयांची खंडणी ची मागणी केली. जर तू नाही देशील तर तुला जिवाने मारेल. अशी धमकी या आरोपीनी दिली आहे. या घटनेची तक्रार गाडगे नगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: