Thursday, May 2, 2024
Homeगुन्हेगारीबाबासाहेबाच्या नावाची कमान पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नसल्याने बेडग गावातील आंबेडकरी...

बाबासाहेबाच्या नावाची कमान पाडणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नसल्याने बेडग गावातील आंबेडकरी समाजाने सोडले गाव…

Share

बेडग ते मंत्रालय पर्यंत निघणार लॉंग मार्च पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी

सांगली – ज्योती मोरे.

मिरज तालुक्यातील बेडग गावातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने होणारी स्वागत कमान पाडल्या प्रकरणी आणि संबंधितावर कारवाई न केल्याने समस्त बेडग गावातील आंबेडकरी समाज बांधवांनी बेडग गाव सोडले.

समस्त बेडग गावातील आंबेडकरी समाजातील ग्रामस्थानी बेडग ते मंत्रालय असा लॉंग मार्च करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांचे मंत्री पद काढून घेण्याची मागणी यावेळी डॉ महेशकुमार कांबळे यांनी केली आहे.

तर जिल्ह्यातील खासदार संजय पाटील पालकमंत्री हे भाजपचे असून प्रशासनावर दबाव टाकून आंबेडकरी समाज बांधवावंवर अन्याय करत असल्याचा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे.

प्रशासनाकडे अनेक स्मरणपत्रे, आंदोलने करून प्रशासनाने दखल न घेता कारवाई न केल्याचा आरोप केला तर आमरण उपोषण सुरू असताना जनसुराज्य पक्षाचे समित कदम वगळता कोणत्याच राजकीय पक्षाने साधी भेट ही दिली नसल्याचा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला तर आज पासून बेडग ते मंत्रालय इथपर्यंत लॉंग मार्च काढणार असून बेडग गावातील आंबेडकरी समाजातील समाज बांधव संसार साहित्य मुले बाळे, वृद्ध तरुण महिला तरुणी खाण्यापिण्याचे साहित्य गुरे ढोरे घेऊन मंत्रालयाच्या दिशेने निघत असल्याची माहिती डॉ महेशकुमार कांबळे यांनी दिली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: