Monday, May 6, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र राज्याचे "बेस्ट रेफ़री" म्हणून अक्षय टेंभुर्णिकर सन्मानित...

महाराष्ट्र राज्याचे “बेस्ट रेफ़री” म्हणून अक्षय टेंभुर्णिकर सन्मानित…

Share

पातूर – निशांत गवई

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेच्या मान्यतेने तसेच नागपुर बॉक्सिंग संघटनेच्या विद्यमाने दी. 21 ते 26 जुलै 2023 दरम्यान नागपुर येथे आयोजित सब-जूनियर मुले/मूली तसेच जूनियर मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या. ह्या स्पर्धे मधे पातुर येथील अक्षय टेंभुर्णिकर ह्यांनी पंच (रेफ़री/जज) म्हणून भूमिका बाजावली होती, त्यांनि केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्पर्धेचा उत्कृष्ट पंच “बेस्ट रेफ़री” चा बहुमान प्रदान करण्यात आला.

अक्षय टेंभुर्णिकर उर्फ़ टीटू नावाने परिचित असलेले भारतीय बॉक्सिंग महासंघाचे तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अधिकृत स्टार 3 मानांकित पातुर तालुक्यातील एकमेव पंच(रेफ़री/जज) आहेत.

खेळाडू असतांना त्यांनि अनेक जिल्हा, राज्यस्तर, विद्यापीठ व राष्ट्रिय स्तरावर सहभाग घेऊन अनेक पदके मिळवून ‘बेस्ट बॉक्सर’, ‘मोस्ट प्रोमोसिंग बॉक्सर’ व ‘बेस्ट लूज़र’ अशे अनेक खिताब सुद्धा मिळवलेले आहेत. आणि आता पंच म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांना ‘बेस्ट रेफ़री’ चा बहुमान मिळाला.

अक्षय टेंभुर्णिकर हे मागील 15 वर्षापासून बॉक्सिंग चे पंच तसेच प्रशिक्षक म्हणून निरंतर काम करत आलेले आहेत, ह्या दरम्यान त्यांनि पहिल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत तांत्रिक अधिकारी, तसेच राष्ट्रिय, अखिल भारतीय पोलिस क्रीड़ा स्पर्धा, आंतर-महाविद्यालयीन, राज्य स्पर्धा इतर अश्या अनेक स्पर्धेमधे तांत्रिक अधिकारी, पंच(रेफ़री/जज), व प्रशिक्षक म्हणून विविध भूमिका उत्कृष्टपणे पार पाडल्यात व महाराष्ट्राचे तसेच पातुरचे नाव उज्ज्वल केले.

त्यांचा अनुभव तसेच दिलेल्या अचूक निर्णयांचे व कटेकोरपणे केलेल्या नियमांचे पालणामुळे त्यांना स्पर्धेचा ‘उत्कृष्ट पंच(बेस्ट रेफ़री)’ चा सन्मान देण्यात आला व पातुरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला. त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ह्या यशाचे श्रेय ते आई, तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, महासचिव डॉ. राकेश तिवारी, ROC प्रमुख श्री. बी.जी. आगवने, ROC सचिव श्री. राजन जोथड़ी, श्री मिलन वैद्य, विभागीय सचिव ऍड. विजय शर्मा, आणि प्रामुख्याने जिल्हा क्रीड़ा अधिकारी तसेच मुख्य प्रशिक्षक डॉ. सतीशचंद्र भट व प्रशिक्षक श्री प्रमोद सुरवाडे ह्यनां देतात.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: