Thursday, May 9, 2024
Homeराज्यअकोला | महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणतात?...पाहा

अकोला | महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत प्रकाश आंबेडकर काय म्हणतात?…पाहा

Share

अकोला | काल महाविकास आघाडीची बैठक मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर सहभागी झाले होते. पण त्यांना एक तास बैठकीबाहेर ठेवण्यात आल्याने ते अर्धवट बैठक सोडून बाहेर निघून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आज अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ओके असल्याचे समजते.

प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या भूमिका काही मुद्दे आघाडीकडे मांडले असल्याचे म्हणाले, ओबीसी यांची मागणी की आमच्या आरक्षणामध्ये इतर कोणी नको हा एक मुद्दा दुसरा जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षण हा एक मुद्दा तिसरा जो आहे दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्याने एक वर्ष आंदोलन केलं आणि तीन कायद्याला स्थगिती दिली आहे त्या संदर्भातली भूमिका काय असावी आणि प्रत्येक घटक पक्षाने आपली ती भूमिका मांडली पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. सोबतच आघाडीबरोबर एकत्र यायचंय सत्ता स्थापन करायची आहे म्हणून कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे या दृष्टीने वेगळे 25 मुद्दे वंचित कडून आघाडीला देण्यात आले. या पंचवीस मुद्द्याच्या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे व प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडली पाहिजे, स्वीकारणे हा सर्व वेगळा भाग.

पुढे म्हणाले, दोन तारखेला ही बैठक आहे त्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर ही जी तीन घटक पक्ष आहेत काँग्रेस,एनसीपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा जागा वाटपाचा फॉर्मुला दोन तारखेपर्यंत तयार होईल आणि त्याचा मसुदा त्यांनी दिला की मग आम्ही कलेक्टिव्हली बार्गेनिंग करायचं का? की प्रत्येक पक्षाशी बोलणी करून तिथे निर्णय होईल. केंद्रामधलं बीजेपीच्या गव्हर्मेंट पुन्हा येणार नाही, आम्ही कुठलाही पर्सनल इगो व इतर काही आड येऊ देणार नाही अशी भूमिका आम्ही मांडतो.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: