Monday, February 26, 2024
Homeगुन्हेगारीअकोला | म्हणून रक्ताचे नातेच झाले जीवाचे वैरी...बार्शीटाकळी तालुक्यातील हादरून सोडणारी घटना...

अकोला | म्हणून रक्ताचे नातेच झाले जीवाचे वैरी…बार्शीटाकळी तालुक्यातील हादरून सोडणारी घटना…

Share

अकोला- आपल्या जातीत नसलेल्या कुटुंबातील मुलीसोबत पळून जाऊन प्रेमविवाहाच्या तयारीत असलेल्या तरुणाची त्याच्याच वडील व भावाने हत्या केली. अकोला जिल्ह्यातील ऑनर किलिंगची ही खळबळजनक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा गावात घडली असून या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी पंचनामा करून तपासा दरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. संदीप गावंडे असे मृताचे नाव आहे. तर आरोपी वडील नागोराव गावंडे व अन्य एक आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवा गावात राहणारे नागोराव गावंडे यांना दोन मुले आहेत. लहान मुलगा संदीप पुण्यात कामाला होता. त्याच गावातील एका अनुसूचित जातीच्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. ही बाब त्यांनी अनेकवेळा घरच्यांना सांगितली होती.

मात्र गावंडे कुटुंबीय या लग्नाला विरोध करत होते. ८ फेब्रुवारी रोजी नागोराव याने संदीपला लग्नाचा हट्ट सोडण्यास सांगितल्याने त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की नागोरावने मोठ्या मुलासह संदीपचा गळा दाबून खून केला. आणि नंतर हातपाय बांधून खोलीत सोडले. एवढेच नाही तर दरवाजा बाहेरून कुलूप लावून दोघेही गावाकडे निघाले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: