Thursday, November 30, 2023
HomeMarathi News Todayअकोला | डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी भरतीमध्ये महाघोटाळा व गैरव्यवहार...

अकोला | डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी भरतीमध्ये महाघोटाळा व गैरव्यवहार झाल्याचा आरोप…

Spread the love

रिपांई (ए) चे ऍड. बुद्धभूषण डी. गोपनारायण यांचा पत्रपरिषदेत आरोप

अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कर्मचारी भरतीमध्ये झालेल्या महाघोटाळा व गैरव्यवहार तसेच पात्र सेवाजेष्ठते नुसार काम करणाऱ्या मजूर कामगारांची फसवणुक करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप आज दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया(ए) सोशल मीडिया व आयटी सेलचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष बुद्धभूषण डी. गोपणारायन यांनी केला

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शा.नि.क्र. संकीर्ण १४१५/प्र.क्र.१२ / ६ चे दि. २४ /७/२०१५ या आदेशाला बगल देवून बेकायदेशिररित्या नेमणुका देवून रोजंदार जेष्ठ व पात्र कामगारांना डावलून फसवणुक केल्याबाबत तसेच दिनांक १४/९/२००५ मध्ये सुध्दा बोगस नोकर भरतीसह इतर घोटाळे विद्यापीठाने केल्याबाबत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक यांच्याकडे दिनांक १९/६/२०२३ रोजी निवेदन देवून संबंधीत प्रकरणामध्ये चौकशी करून मजूर कामगारांवर झालेल्या अन्यायावर तसेच बोगस नोकर भरतीमध्ये अनियमितता याची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि संबंधीत दोषी अधिकान्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व मजूर कामगारांना दि. १४/९/२००५ पासुन सेवाजेष्ठतेनुसार पात्र मजुरांना शासना तर्फे आर्थिक मदत देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावर सहसंचालक यांनी सदर प्रकरणाचे पृष्ठयार्थ लिखीत पुरावे देण्यास कळविले होते.

त्याअनुषगाने ४६३ पानाचे शासकीय कागदपत्रे कृषी परिषदेस सादर केले. त्या अनुषंगाने सहसंचालक यांनी संबंधीत प्रकरणामध्ये चौकशी समिती गठीत केली. तसेच संबंधीत कर्मचारी भरती घोटाळयामध्ये बोगस नोकरी भरतीमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. अकोला रजि.नं. १४४ येथील तात्कालीन अध्यक्षांनी पतसंस्थेची उपविधी व नियमावाली धाब्यावर टांगून मनमानी कारभार केला आहे. सन २००५ व २०१५-१६ मध्ये झालेल्या बोगस नोकर भरतीमध्ये संबंधीत पतसंस्थेची उपविधीला छेद देवून नियमबाहय पध्दतीने कर्ज वाटपाची तक्रार सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांच्याकडे करून संबंधीत प्रकरणामध्ये आयुक्त यांच्या तर्फे जिल्हा उपनिबंधक यांना पत्राद्वारे संबंधीत तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्यास पत्राद्वारे कळविले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत करून पतसंस्थेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

शासन निर्णय २४जुलै २०१५व १६नोव्हेंबर २०१५ नुसार २५४. रोजनंदार मजूर यांना सेवेत सामावून घेतले असून उर्वरित १३७१ रोजनंदार मजूर यांना सेवा जेष्ठता नुसार विद्यापीठ सेवेत सामावून घेण्यासाठीचा प्रस्ताव ७जुलै २०१८ रोजी शासनास सादर करण्यात आला आहे.१४ऑगस्ट २००५ रोजी प्रसिद्ध जाहिरातीच्या अनुषंगाने झालेल्या भरती प्रक्रिया बाबत ३विभागीय चौकशी समित्या स्थापन केल्या होत्या. या समिती ने दिलेल्या अहवालानुसार दोषी आढळलेल्या ४कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केले होते असे पत्र सह संचालक प्रशासन कृषि परीषद पुणे यांनी सांगतांना या व्यतिरिक्त पुरावे असल्यास द्यावे असे कळवील्यानुसार २८ऑगस्ट २०२३ रोजी ४६३पानांचे पुरावे सादर करण्यात आले आहेत त्यामुळे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीडित रोजंदारी कामगारांना न्याय देण्यासाठी संबधीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पीडित कामगारांना त्यांचा आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी ऍड बुद्धभूषण डी गोपनारायणसह प्रकाश सदाशिव, शेषराव शिरसाट ,राहुल आठवले ,दत्ता घोडगे, टाकसागर, अजय गवई ,अरुण दंदी, स्वप्नील भावे ,अजय शिरसाठ ,सागर जामणिक, दत्तात्रय ठाकूर आदींची उपस्थिती होती.


Spread the love
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: