Friday, May 17, 2024
Homeराज्यअकोला | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार...आरोपी अटक...

अकोला | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…आरोपी अटक…

Share

पातूर – निशांत गवई

अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर शहरातीलच राहणाऱ्या एका मुलाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला असून सदर आरोपी विरुद्ध विविध गुन्हे दाखल करून आरोपी यास पातूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहरात राहत असलेल्या पीडित मुलीचे वडील हे आरोपी च्या वडिलांच्या शेतात मुकादम म्हणून काम करत असतांना त्या ठिकाणी पीडित मुलीची आरोपी इम्रान शाह याच्या शि ओळख झाली असता आरोपी हा पीडित मुलीचा शाळेत जात असतांना पाठलाग करायचा ओळखी मुळे दोघांच्या प्रेम प्रकरण सुरु झाले असता मि तूझ्या सोबत लग्न करतो,

असे म्हणून अल्पवयीन मुली सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असता अल्पवईन असलेल्या पीडितेला दिवस गेले सदर चि घटना तिने आरोपी इम्रान शाह याने लग्नास नकार दिला असता सदर चि घटना पीडित मुलीने घरी सांगितली असता पीडित मुलीच्या आईने पीडित मुलीला घेऊन पोलीस स्टेशनं गाठून आरोपी इम्रान शाह हातम शाह रा. मुजावर पुरा याचे विरुद्ध अप क्रमांक 288/23 कलम 376,376(2)(N )506 भादवी सह कलम पास्को ऍक्ट सह कलम 3(i)(w)(i)(ii)3(2)(v)अ. जा. ज. अ. प्र. का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रान शाह हातम शाह यास पातूर पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शन खाली पातूर पोलीस करत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: