Sunday, May 12, 2024
Homeसामाजिकआ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले महासंत तुलसीदास यांना अभिवादन...

आ. अँड. आकाश फुंडकर यांनी केले महासंत तुलसीदास यांना अभिवादन…

Share

खामगाव – हेमंत जाधव

आ. अँड. आकाश फुंडकर यांनी महासंत तुलसीदास छंगानी यांना जयंती निमित्त अभिवादन केले. ब्राह्मण समाजाचे महान संत तुलसीदास महाराज छंगानी यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही संत तुलसीदास भजनी मंडळ व पुष्करणा ब्राह्मण समाज खामगाव यांच्या वतीने स्थानिक सराफा भागातील माहेश्वरी भवन येथे लक्ष्मीपूजनापासून आयोजित करण्यात आला.

यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त न 16 नोव्हेंबर रोजी अन्नकुट महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आ. अँड. आकाश फुंडकर यांनी उपस्थिती दर्शविली व महासंत तुलसीदास महाराज छंगानी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.

तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, जितेंद्र पुरोहित, नरेंद्र पुरोहित ,माजी नगरसेवक सत्यनारायण थानवी, विजय उगले, राकेश ओझा, नागेंद्र रोहनकर, विष्णु पुरोहित ,गोपेश बोहरा, राधेश्याम छांगाणी, राजू वर्मा ,कैलास बोहरा ,बबलू पुरोहित, अनु जोशी बबलू छांगानी यांची उपस्थिती होती.

पुष्करणा ब्राह्मण समाज बांधव संत तुलसिदास महाराज भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांची आ. अँड. आकाश फुंडकर यांनी भेट घेऊन त्यांना या जन्मोत्सव सोहळ्याच्या व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: