Monday, May 6, 2024
HomeMarathi News Todayअजित पवारांच्या एंट्रीने शिंदे गटाची उडाली झोप?…सर्व कामे सोडून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत...

अजित पवारांच्या एंट्रीने शिंदे गटाची उडाली झोप?…सर्व कामे सोडून मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत काय झाले?…वाचा

Share

न्यूज डेस्क : राज्याचे राजकारण क्षणोक्षणी बदलत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता काका-पुतण्यामध्ये जुंपून दिल्याने अवघा देश उघड्या डोळ्यांनी राजकारणाचा तमाशा बघत आहेत. शरद पवार यांच्या विरोधात बंड केल्यानंतर अजित पवार रविवारी भाजप आणि शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी ‘महायुती’ म्हणजेच युतीची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या 8 समर्थक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनीही बुधवारी ताकद दाखवून दिली. या संपूर्ण प्रकरणावरून एकनाथ शिंदे गटातील आमदार खासदारांची झोपच उडाली आहे.

यावर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून त्यांनी आमदार-खासदारांची तातडीने बैठक बोलावली. आता या बैठकीबाबत शिवसेनेची (शिंदे गट) बैठक झाल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी निवेदन दिले आहे. युतीमध्ये कोणतेही मतभेद असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नाकारले आहे. उदय सामंत
एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची चर्चाही चुकीची असल्याचे उदय सामंत म्हणाले. तिन्ही पक्षांचे नेते मिळून सरकार चालवतील, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाल्याचे ते म्हणाले. आमदार, खासदार आणि विधानपरिषदेच्या (एमएलसी) सदस्यांसाठी पुढे काय करायचे यावरही सविस्तर चर्चा झाली. शिवसेना 2024 ची निवडणूक शिंदेजींच्या नेतृत्वाखाली लढणार आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही शिंदे गटातील एकाही नेत्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यांचा समोरच अजित पवार यांच्या नवीन 9 जणांना मंत्री करण्यात आल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शनानंतर घोषणा केली की, मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशा स्थितीत शिवसेनेत असंतोष पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर ते कधीच राष्ट्रवादीसोबत गेले नसते, असे शिंदे गटाचे आमदार वारंवार सांगत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सत्तेत सहभागी होणे म्हणजे सत्तेत वाटाघाटी करणे… अशा नाराज शिवसेना आमदारांच्या गटाने आपल्याला लवकरात लवकर मंत्रीपदे देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नाराज आमदारांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे.

शिंदे यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी केली होती
गेल्या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 10 अपक्षांसह शिवसेना सोडली आणि नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या आमदारांवर अन्याय करत असल्याचा आरोप खुद्द एकनाथ शिंदे यांनीच केला होता. ते म्हणाले, ते आमच्या आमदारांना निधी देत ​​नव्हते, म्हणून आम्ही हे सरकार सोडले आहे.

मात्र आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अशा स्थितीत अजित पवार यांचा महायुतीत समावेश केल्याने पुन्हा निधीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे शिंदे गटातील आमदारांचे मत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: