Homeराज्यसरकारच्या निर्णया विरोधात वडापचालकांचा काळ्या गुढ्या उभारून निषेध - ३ एप्रिल रोजी...

सरकारच्या निर्णया विरोधात वडापचालकांचा काळ्या गुढ्या उभारून निषेध – ३ एप्रिल रोजी चक्काजाम आंदोलनाचा इशारा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने एसटीच्या तिकीट दरात महिलांना 50 टक्के इतकी सवलत दिली आहे या निर्णयाचा महिला वर्गातून मोठ्या उत्साहात स्वागत झालं मात्र खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चालकांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे आजचा गुढीपाडवा या गाड्या मालकांनी काळ्या गुढ्या उभारून साजरा करत,सरकारचा निषेध व्यक्त केलाय.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकारनं महिलांच्या बाबतीत अर्ध्या तिकिटाचा निर्णय घेताना कोणत्याही टॅक्सी मालक चालक संघटनेशी चर्चा न करता अथवा त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेऊन सदर टॅक्सी चालकांच्या चुलीत पाणी ओतायचं काम केल्याची प्रतिक्रिया, सांगली जिल्हा टॅक्सी चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष उदयसिंह घोरपडे यांनी व्यक्त केलीय. 3 एप्रिल रोजी या विरोधात चक्काजाम आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: