Wednesday, November 29, 2023
Homeराज्यरामटेक स्वच्छतेची पाहणी करतांना प्लास्टिक पिशवी वापर करणार्‍यावर मुख्याधिकारी यांची कारवाई...

रामटेक स्वच्छतेची पाहणी करतांना प्लास्टिक पिशवी वापर करणार्‍यावर मुख्याधिकारी यांची कारवाई…

Spread the love

प्लास्टीक पिशवी वापर करणार्‍या व्यापार्‍यावर मुख्याधिकारी नगर परिषद , रामटेक यांनी दिली सक्त ताकीद…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र राज्यात एकल वापर प्लास्टिक बंदी लागु असतानाही त्याचा वापर रामटेक शहरात वापर होत असल्याची माहिती होती. रामटेक नगर परिषद मधील मुख्याधिकारी मँडम पल्लवी राऊत यांनी शहरातील स्वच्छेतेची पाहणी करत असतांना दि. २१/०९/२०२३ ला कृष्ण डेअरी रामटेक, राजस्थान मिठाईवाला रामटेक,

फळविक्रेते यांच्या कडुन रामटेक नगर परीषद प्रशासनाने विशेष मोहीम राबवून तब्बल जवळ पास ३-४ कि.ग्रॅम प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी एकव वापर प्लास्टिक वाट्या , चमचे , प्लास्टिक ची आवरण असलेल नास्ताच्या प्टेट इत्यादी वस्तु जप्त केल्या. जप्ती केलेल्या दुकान दारांना सक्त ताकिद दिली आहे.

बदी असलेल्या प्लास्टिक चा वापर केला तर पहीला गुन्हा रु. ५०००/- दुसरा गुन्हा रु. १००००/- तिसरा गुन्हा रु.२५०००/- व तिन महीन्याचा कारावास असे समजावून सांगितले.

तसेच स्वच्छतेची कारवाई दरम्यान बेवारस पडलेल्या अनाधिकृत अतिक्रमण सामान जप्त केले असुन त्यावर प्रत्येकी रु. १०००/- दंड ठोकण्यात आला. स्वच्छतेच्या कारवाई दरम्यान मुख्याधिकारी मँडम पल्लपी राऊत , शहर समन्वयक नितेश सांगोळे , सफाई मुकादम राजेश चिटोले , वाहन चालक मनिष रंगारी , आनंदराव ठाकरे व इतर सफाई कर्मचारी यांनी सहकार्य केल.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: