Sunday, May 5, 2024
Homeगुन्हेगारीनांदेड जुना मोंढा येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी चोवीस तासाच्या आत स्थानिक गुन्हे...

नांदेड जुना मोंढा येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी चोवीस तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड – शहरातील वजीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्यीमध्ये जुना मोंढा चौक, सार्वजनिक रस्त्यावर अज्ञात कारणावरुन आरोपीतांनी प्रीतीसिंह हरिसिंह तोमर वय 43 वर्ष रा. चिरागगल्ली गणेश टॉकीज रोड जुना मोंढा, नांदेड याचा खंजरने खुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 308/2023 कलम 302 भा.द.वि सहकलम 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये दिनांक 26/07/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.

दिनांक 27 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा चे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नमुद गुन्हा करणारा आरोपी हा गुरुव्दारा गेट नंबर 4 बडपुरा, नांदेड येथे असल्याबाबत माहीती मिळालेने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे विल्लासिंघ ऊर्फ अमरसिंघ पि. हिरासिंघ चितोडीया वय 35 वर्ष व्यवसाय जडीवुटी विक्रेता रा. गेट नंबर 4 समोर बडपुरा, नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. नमुद आरोपीस स्थागुशाने 24 तासाचे आत ताब्यात घेवुन त्यास पोलीस ठाणे वजीराबाद येथे गुन्हयाचे तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, भोकर खंडेराव धरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागूशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि/जसवंतसिंघ शाहु, गोविंद मुंडे, सपोउपनि / माधव केंद्रे, संजय केंद्रे, पोह/ शंकर म्हैसनवाड, पोना/ विठ्ठल शेळके, पोकॉ/ मोतीराम पवार, तानाजी येळगे, गजानन बयनवाड, राजु पुलेवार, चालक पोकॉ/गंगाधर घुगे स्थागुशा, नांदेड व सायबर सेलचे राजु सिटीकर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: