Saturday, May 18, 2024
Homeराज्यचिखलगाव येथील सैनिकांचा अपघाती मृत्यू; मंगळवार रोजी करण्यात आले शासकीय इतमामत अंत्यसंस्कार...

चिखलगाव येथील सैनिकांचा अपघाती मृत्यू; मंगळवार रोजी करण्यात आले शासकीय इतमामत अंत्यसंस्कार…

Share

जावई व भाऊ सुद्धा सैन्यात तैनात

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील चिखलागाव येथील सैनिक सूरज सिरसाट यांचे रविवार दिनांक १० डिसेम्बर रोजी रात्री आठवाजता च्या दरम्यान वाशीम बायपास रोड वर दुचालीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली होती या अपघातात सैन्यात असलेले जवान मेजर सूरज तेजराव सिरसाट यांचा जागीच मृत्यू झाला. आज मंगळावर १२ डिसेंबर रोजी त्यांचे जन्मगाव चिखलगाव येथे शासकीय इतमामत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अकोला जिल्ह्य पातूर तालुक्यातील चिखलगाव येथील रहिवासी मेजर सूरज तेजराव सिरसाट हे लद्दाक सियाचीन येथे देश रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत होते. त्यांचे मोठे भाऊ हे देखील सैन्यातच भरती असून ते देखील माय भूमीचे रक्षण करीत आहेत. तर मेजर सूरज शिरसाठ हे नुकतेच सुटीवर चिखलगाव यांच्या घरी आले होते.

अकोल्यावरून आपले काम आटपून आपल्या दुचाकीने मेजर सूरज व त्यांचा सोबती हे रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी अकोल्यातून चिखलगाव येथे आपल्या घरी जात असताना अकोला वाशीम बायपास जवळील एका फार्म हाऊस समोर एका अज्ञात वाहणाने त्यांना जबर धडक दिली व हे वाहन तेथून पसार झाले.

धडक एवढी जबर होती की या धडकेत मेजर सूरज यांचा मृत्यू झाला. मेजर सुरज यांच्या मागे आई वडील, सात महिन्याची गर्भवती पत्नी, एक लहान मुलगी असून या घटने मूळे सर्वत्र दुःख पसरले आहे. सूरज सूरज यांचे पार्थिव सजवलेल्या गाडीतून नेण्यात येत असताना संपूर्ण गावकरी मेजर सूरज यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले होते.

आपल्या मायभूमी चे रक्षक करणाऱ्या मेजर सूरज तेजरावं शिरसाठी यांना सायंकाळी शासकीय इतमामात अग्नी अमर रहे अमर रहे मेजर सूरज अमर रहे! या घोषणा देत सैन्य दलाने मान वदंना देत मेजर सूरज यांची पत्नी, मुलगी, गावकरी नातलग व त्यांच्या इष्टमित्रानी अखेरचा निरोप दिला..


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: