Friday, May 3, 2024
Homeराज्यमहाराष्ट्राच्या राजकीय गोंधळा संदर्भात मनसेची एक सही संतापाची मोहीम...

महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळा संदर्भात मनसेची एक सही संतापाची मोहीम…

Share

अकोला – सध्या महाराष्ट्रा मध्ये जो राजकीय गोंधळ सुरु आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोलाच्या वतीने शनिवारी दि ८/७/२०२३ रोजी स्थानिक जुने इनकम टॅक्स चौक येथे एक सही संतापाची हि मोहीम राबविण्यात आली.

गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणाचा जो खेळ सुरू आहे, त्या संदर्भात आज सर्वसामान्य माणसाला कुठे तरी राग,चीड, संताप व्यक्त करायचा आहे, एकदा कि मतदारांनी मतदान केले की त्यांना पाच वर्षे गृहीत धरून आपला राजकीय खेळ या ठिकाणी सुरु आहे, त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक सही संतापाची हि मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर मोहिमेस प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत त्यांचा राग व्यक्त केला आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,महानगर अध्यक्ष सौरभ भगत,शहर संघटक अरविंद शुक्ला,जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाले,जिल्हा सहसचिव मोहन मते,महानगर अध्यक्ष राकेश शर्मा, शहर उपाध्यक्ष राजेश पिंजरकर,सोनू अवचार,शुभम कवोकार,मुकेश धोंडफळे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार,विभाग अध्यक्ष राजेश राठी,

अमोल भेंडारकर,तालुका अध्यक्ष विजय बोचरे,शहर उपाध्यक्ष शेखर पोटदुखे,तालुका उपाध्यक्ष सतीश खाकरे ,गणेश सावरकर, मनविसे तालुकाध्यक्ष सौरभ फाले, प्रेम पाटील आदी पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: