Monday, May 6, 2024
Homeराज्यपातूर येथे जुगार अड्डयावर धाड एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त...

पातूर येथे जुगार अड्डयावर धाड एक लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त…

Share

पातूर – निशांत गवई

वाशीम महामार्गवर जुगार सुरु असलेल्या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी धाड टाकून एक लाख रुपया च्या मुद्देमाल सह एका आरोपी ला अटक करण्यात आली असून दोन जण फरार झाले असून सदर चि कारवाई आज दिनांक 13 जून च्या सायंकाळी साडे पाच वाजता च्या दरम्यान करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाशीम महामार्ग वर रस्त्याच्या कडेला जुगार सुरु असल्या चि गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली असता या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली असता या कारवाईत आरोपी तवागर यास अटक करण्यात आली.

असून शे. साजिद शे. याकूब, बगु खान रूम खान हे दोघे फरार होण्यात यशस्वी झाले असून या कारवाईत एक विवो कंपनी चा मोबाईल किंमत दहा हजार रुपये, नगदी 2330 रुपये तसेच मोटारसायकल क्रमांक MH 30AQ 2559 स्प्लेंडर प्रो किंमत 35 हजार रुपये MH 30BK 7535 हिरो स्प्लेंडर किंमत 50 हजार,

MH 30BK 4685 हिरो डु्लेक्स किंमत 40 हजार असा एकूण 1,12,330 रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून हि कारवाई सहा. ठाणेदार गजानन पोटे, हे. कॉ. दिलीप इंगळे, हिम्मत डिगोळे, मनोजसिंग ठाकूर, वासिमोद्दीन इस्माईलोद्दीन, अजय ठाकूर आदी. नि केली असून वृत्त लिहेस्तोवर गुन्हा दाखल करण्याचि प्रक्रिया सुरु होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: