Friday, May 24, 2024
Homeराज्यरामटेक येथे कारसेवकांचा भव्य सत्कार सोहळा...

रामटेक येथे कारसेवकांचा भव्य सत्कार सोहळा…

रामटेक – राजु कापसे

रामटेक – श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे कारसेवा करून, मंदिर निर्माण होण्यासाठी योगदान देणाऱ्या रामटेक, मौदा, पारशिवनी येथील कारसेवकांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक १० फेब्रुवारी, शनिवारी सायंकाळी ०५:३० वाजता सुपर मार्केट रामटेक येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

कार सेवकांचा सत्कार साधू संतांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी सुश्री साध्वी वंदनाजी महाराज, श्री सिध्द नारायण टेकडी, अंबाळा, परम पुजनिय महानत्यागी महंत श्री छोटे बालकदासजी महाराज, सुर-संगम सिद्ध आश्रम धर्मापुरी, महंत श्री कैलाशपुरी महाराज, नागार्जुन, रामटेक, स्वामी शिवप्रेमानंद महाराज रामकृष्ण नवजीवन आश्रम,

अंबाळा, महंत श्री विष्णूगिरी महाराज दादाजी धुनीवाले आश्रम, अंबाळा, श्री मोहनराव महाराज पंडे मुख्य पुजारी, श्रीराम मंदिर, रामटेक. आधी साधुसंत उपस्थित राहणार असून यावेळी मा.श्री. श्रीधरराव गाडगे, मा.प्रांत सहसंचालक, रा.स्व. संघ, विदर्भ प्रांत, यांचे उद्बोधन होणार आहे.

श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचा, त्यागाचा, शौर्याचा इतिहास, संघर्षाची गाथा जाणून घेण्यासाठी सह परिवार आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन कारसेवक सत्कार समितीतर्फे करण्यात आलेले आहे

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments