Homeगुन्हेगारीत्या कार्यकर्तीवरील फायरींगच्या गुन्हयाचा बनावट कट उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

त्या कार्यकर्तीवरील फायरींगच्या गुन्हयाचा बनावट कट उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड बाफना ब्रिज या ठिकाणी सामाजीक कार्यकत्यां सौ. सविता बाबुराव गायकवाड रा. शक्तीनगर, नांदेड हीचेवर आरोपी रहीमखान नुरखान व त्याचा भाऊ जाफर रा. एकबालनगर, परभणी यांनी व इतरांनी अग्नीशस्त्राने फायरींग करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला असी फिर्याद सौ. सविता गायकवाड यांनी दिले वरुन पोलीस ठाणे इतवारा, नांदेड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 12 / 2023 कलम 307,34 भादवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल आहे. परंतु हा कट बनावट असल्याचे स्थायिक गुन्हे शाखेने उघड केले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणात काय सत्य आहे, या बाबत सत्य शोधुन काढण्यासाठी स्था.गु.शा. पोनि द्वारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले. त्यांनी व त्यांचे अधिपत्याखालील सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे यांनी त्या घटनेचा मागावा घेतला आणि परभणी येथील रहीमखान नुरखान व त्याचा भाऊ जाफर रा. एकबालनगर, परभणी यांना दिनांक 10/01/2023 रोजी रात्रीच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला नसल्याची पोलीसांची खात्री झाली.

त्यानंतर पोलीसांनी तपासचे उलट चक्र सुरु केले. तेव्हा सत्य बाब असी उघड झाली की, मागील सहा महिन्यापुर्वी आयचर वाहन चोरी प्रकरणात पोलीस ठाणे भोकर येथे रहीमखान रा. परभणी याने सौ. सविता गायकवाड व तीचा साथीदार आतीकखान रा. नांदेड यांचे नांव घेतले होते.

त्यामुळे त्या घटनेचा राग मनात धरुन दिनांक 06/01/2023 रोजी रात्री 10.00 वाजता सौ. सविता गायकवाड व फैसल यांनी किरायाची फोरव्हीलर घेऊन रहीमखान याचे घरी परभणी येथे गेले होते. तेथे रहोमखान व सविता गायकवाड यांचा वाद झाला, त्यातुन रहीमखान याने पोलीसा ठाणे मोंढा, परभणी येथे सविता गाकयावाड हीचे विरुध्द दिनांक 07/01/2023 रोजी पोलीस ठोण मोंढा परभणी गुरनं. 04/2023 कलम 452, 323, 504, 506, 34 भादंवि चा गुन्हा दाखल केला होता.

त्यावरुन तीचे मनात रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांचे बाबत मनात राग आला. त्यांना कसेही करुन कोणत्याही गुन्हयात फसविण्याचा ठाम सविता गायकवाड होने निर्णय घेतला दिनांक 11 जानेवारी रोजी वर नमुद गुन्हयाचे घटनेमध्ये स्था.गु.शा. चे पोनि स्थागुशा व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधीकारी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी किरण सुरेश मोरे रा. धनेगांव व आवघुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हयाचा व रचण्यात अलेल्या कटाचा सर्व उलघडा केला.

त्यांनी सांगीतले की, दिनांक 09/01/2023 रोजी सौ. सविता गायकवाड होने गोपिनाथ बालाजी मुंगल रा. धनेगांव व किरण सुरेश मोरे रा. धनेगांव, आवधुत ऊर्फ लहुजी गंगाधर दासरवाड रा. बळीरामुपर, विकास कांबळे रा. हदगांव ह.मु. धनेगांव यांना फोन करुन घरी बोलावुन घेऊन, मला परभणी येथील रहेमतखान व जफरखान हे परेशान करीत आहेत, माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केले आहेत, मला त्यांना धडा शिकवायचा आहे,

असे म्हणुन किरण मोरे व गोपीनाथ मुंगल यांना पिस्टल घेऊन बाफना येथे या, मला गोळी मारुन निघुन जा असे सांगीतले. त्या प्रमाणे किरण मोरे व गोपिनाथ मूंगल यांनी पिस्टल घेऊन बाफना येथे आले. सविता गायकवाड ही त्या दोघांनी वाट पहात बाफना ब्रिजवर थांबली होती. किरण मोरे व गोपिनाथ मूंगल हे तेथे आले. त्यानंतर बाफना ब्रिजवर किरण मोरे हा ये-जा करणारे वाहनावर वॉच ठेवुन होता,

त्याच रात्री 11.00 वाजता बाफना ब्रिजवर कोणीही नसल्याचे प्रसंग साधुन सविता गायकवाड सांगीतल्या प्रमाणे गोपिनाथ मुंगल यांने सविता गायकवाड हीचे डाव्या दंडावर पिस्टलमधुन एक गोळी मारुन जखमी केले. त्यानंतर तेथुन गोपिनाथ मुंगल व किरण मोरे हे निघुन गेले. आणि सविता गायकवाड ही फोन करुन परभणी येथील रहीमखान व त्याचा भाऊ जफरखान यांनी मला रस्त्यात बाफना ब्रीजवर आडवुन गोळी मारुन मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन पोलीसांना बोलावुन घेतले.

घटनचे आवचीत साधुन पोलीसांनी सविता गायकवाड हीस तात्काळ सरकारी दवाखाना, विष्णुपुरी नांदेड येथे नेऊन शरीक केले असुन उपचार घेत आहेत. सविता गायकवाड यांचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे इतवारा गुन्हा रजिस्टर क्र. 12/2023 कलम 307,34 भादंवि सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम हा गुन्हा दाखल आहे.

त्यात सविता गायकवाड हीचेवर फायरींग करण्यासाठी वापरलेली पिस्टल गोपिनाथ मंगल व विकास कांबळे हे पळुन गेले आहेत. गोपिनाथ मंगल यांने आमचेकडे ठेवलेली दुसरी पिस्टल व चार काडतुस आमचेकडे आहेत असे म्हणुन आवधुत दासरवाड यांने एक पिस्टल व चार जिवंत काडतुस हजर केले. या दोन आरोपीकडुन मिळून आलेली पिस्टल व काडतुस जप्त करण्यात आले असुन, त्या संबंधीत पोलस ठाणे नांदेड ग्रामीण येथे शस्त्र अधिनियम नुसार वेगळा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कामगीरी श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, श्री अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि दत्तात्रय काळे, पदमा कांबळे, तानाजी येळगे, विलास कदम, मोतीराम पवार, महेश बडगु, राजु सिटीकर, गंगाधर घुगे, मारोती मुंडे, दादाराव श्रीरामे, हेमंत बिचकेवार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी कौतूक केले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: