Tuesday, June 18, 2024
spot_img
Homeराज्यअल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पातुर पोलिसात गुन्हा दाखल...

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पातुर पोलिसात गुन्हा दाखल…

  • अल्पवयीन मुलींच्या बाबतीत 48 तासात दुसरी घटना…
  • आरोपीस पातुर पोलिसांनी केली अटक…

पातुर – निशांत गवई

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरातील एका अल्पवयीन मुली ला लाज वाटेल असे कृत्य करून पैशाचे आमिस दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना दिनांक 20/6/2023 ला घडली आरोपी युवक नेहमी मुलीच्या घरालगत असलेल्या शाळेजवळ येत होता.

घटनेच्या दिवशी अल्पवयीन मुलगी घरामागे झाडत असताना आरोपीने मुलीला लाज वाटेल असे कृत्य करून पैसे दाखवून तिचा विनयभंग केला अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिची मोठी बहीण आली असता आरोपीने पळ काढला सदर प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी पातुर पोलिसात तक्रार केली,

असता पातुर पोलिसांनी अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली होती मात्र सदरची वार्ता पातुर शहरातील सुज्ञ पत्रकार तथा प्रतिष्ठित नागरिक यांना समजल्यानंतर दिनांक 21 6 2023 ला पातुर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सोफियान खान समद खान राहणार मोमीनपुरा यांच्याविरुद्ध कलम 354 अ एक-दोन पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी आरोपीला पातुर न्यायालयात पेस केले केले असता अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे सदरची घटना ही शहरातील 48 तासात दुसरी घटना घडली असून 48 तासापूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ति सहा महिन्याची गर्भवती झाली याप्रकरणी आरोपी शहा हातांमशाहा विरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणातील आरोपीला न्यायालयात पेस केले होते तेव्हा न्यायालयाने 22 6 2023 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली होती त्यानंतर याही आरोपीची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पुढील तपास पातूरचे प्रभारी ठाणेदार वाघमारे करीत आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: