Monday, May 13, 2024
Homeराज्यअ.भा. हिंदी संस्था संघाच्या अध्यक्षपदी अजय पाटील…

अ.भा. हिंदी संस्था संघाच्या अध्यक्षपदी अजय पाटील…

Share

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर अखिल भारतीय हिंदी संस्था संघाच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. अध्यक्षपदी नागपूर येथील अजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अध्यक्षपदाचा पदभार नागपुरातीलच डॉ. गिरीश गांधी यांच्याकडे होता. ती धुरा आता अजय पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. उपाध्यक्ष प्रा. चंद्रदेव कवडे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

सचिव एस.आर. गादवाड, सहसचिवपदी जानकी बल्लभ तर कार्याध्यक्षपदी विजय परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षकपदी डॉ. गिरीश गांधी, कृष्णानंद झा, डॉ. राजेंद्रभाई खिमाणी यांची निवड करण्यात आली आहे. अजय पाटील सध्या महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष आहेत.

गुवाहाटी येथील असम राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुरीतील ओडिशा राष्ट्रभाषा परिषद, बेंगळुरू येथील कर्नाटक महिला हिंदी सेवा समिती, कर्नाटक हिंदी प्रचार समिती, थिरुवअनंतपुरम येथील केरल हिंदी प्रचार सभा, अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठ, इलाहबाद येथील प्रयाग महिला विद्यापीठ, चेन्नई येथील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी विद्यापीठ, मैसूर हिंदी विद्यापीठ,

महाराष्ट्र राजभाषा सभा पुणे, इंफालची मणीपूर हिंदी परिषद, आयजोल येथील मिझोरम हिंदी परिषद, वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समिती, राजकोट येथील सौराष्ट्र हिंदी प्रचार समिती, मुंबईतील हिंदुस्थानी प्रचार सभा, हैदराबादच्या हिंदी प्रचार सभा, देवघरच्या हिंदी विद्यापीठ, हिंदी साहित्य संमेलन इलाहाबाद, मुंबई हिंदी सभा,

जयपूरच्या हिंदी प्रचार प्रसार संस्थान, कटकच्या हिंदी शिक्षा समिती, हुबळीच्या बेळगाव विभागीय हिंदी सेवा शिक्षण समिती या संस्था अखिल भारतीय हिंदी संस्था संघाशी संलग्न असून त्या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून पाटील काम पाहणार आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: